पुढील दोन वर्षांमध्ये देशात ई-बसेसचा वापर वाढणार; रेटिंग एजन्सी इक्राला विश्वास

रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत एकूण बस विक्रीपैकी 8-10 टक्के प्रमाण हे ई-बसेसचं असेल.

पुढील दोन वर्षांमध्ये देशात ई-बसेसचा वापर वाढणार; रेटिंग एजन्सी इक्राला विश्वास
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 7:36 AM

मुंबई : रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत एकूण बस विक्रीपैकी 8-10 टक्के प्रमाण हे ई-बसेसचं असेल. भारताच्या विद्युतीकरण मोहिमेत बसेसदेखील या विभागात आघाडीवर असतील. इक्राने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे सार्वजनिक वाहतूक विभागातील आव्हाने निर्माण झाली आहे, असे असूनही ई-बस विभागात वाढ दिसून आली आहे. (Rating agency ICRA says Use of Electric Buses will increase in next two-three years)

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या एक्सेप्टन्स अँड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच FAME योजनेचा कालावधी 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे मध्यम कालावधीत या सेगमेंटला चालना मिळेल. इक्राने म्हटले आहे की, साथीच्या आजारामुळे ही योजना ग्राऊंड लेव्हलपर्यंत पोहोचवण्यात काही अडचणी आल्या, तसेच आत्तादेखील अनेक आव्हाने समोर आहेत. FAME (Faster Adoption and Manufacturing of (Strong) Hybrid and Electric Vehicles) योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेसवर भांडवली अनुदानाची तरतूद आहे.

इक्रा रेटिंग्सचे उपाध्यक्ष आणि को-ग्रुप हेड श्रीराकुमार कृष्णमूर्ती म्हणाले की, “इलेक्ट्रिक बस प्रकल्पांमध्ये बसची किंमत एकूण प्रकल्पाच्या 75-80 टक्के आहे. FAME II योजनेअंतर्गत प्रति बस 35-55 लाख रुपयांच्या भांडवली अनुदानासह, प्रकल्पाच्या खर्चाचा एक मोठा भाग भांडवली अनुदानाद्वारे पूर्ण केला जाऊ शकतो, जो 40 टक्क्यांपर्यंत असू शकतो. या प्रकल्पांच्या व्यवहार्यतेसाठी हे चांगले आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरातकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech) गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (GSRTC) 9 मीटरच्या 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवर (GCC) अतिरिक्त 50 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचा आदेश आहे. या 50 इलेक्ट्रिक बसेस 12 महिन्यांच्या कालावधीत दिल्या जातील. कंपनी कराराच्या कालावधीत या बसेसची देखभाल देखील करेल.

या नवीन आदेशासह, ऑलेक्ट्राकडे एकूण 1350 इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे एमडी के. व्ही. प्रदीप म्हणाले की, “त्यांना गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”. या नवीन ऑर्डरमुळे, आमच्या ऑर्डर बुकचा आकडा सुमारे 1350 बसेसपर्यंत पोहोचला आहे. आम्ही आधीच सुरतमध्ये बस चालवत आहोत. या नव्या आदेशामुळे आता गुजरात राज्यात त्यांच्या 250 इलेक्ट्रिक बसेस असतील.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज इलेक्ट्रिक बस

या 9 मीटर एसी बसमध्ये प्रवासी आरामात प्रवास करू शकतो. यात इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनसह 33 अधिक एक ड्रायव्हर अशी आसन क्षमता आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बसेस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. यात एक इमरजन्सी बटण, एक यूएसबी सॉकेट आहे. बसमध्ये बसवलेली लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी ट्रॅफिक आणि प्रवासी भार (बसमधील एकूण वजन) परिस्थितीनुसार बसला 180-200 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम करते. म्हणजेच सिंगल चार्जवर ही बस 180 ते 200 किलोमीटपर्यंत धावेल.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 236 किमी रेंज, Simple Energy ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, किंमत…

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम (EV) जारी, जाणून घ्या सर्वकाही

पेट्रोल आणि डिझेल आता विसरा, तुमची कार पाण्याच्या मदतीने धावणार, जाणून घ्या

(Rating agency ICRA says Use of Electric Buses will increase in next two-three years)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.