Rolls-Royce ची पहिली इलेक्ट्रिक कार Spectre लाँचिंगसाठी सज्ज, टेस्टिंगदरम्यान दर्शन
गेल्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचं (Electric Vehicle) सेगमेंट झपाट्याने विस्तारलं आहे आणि अनेक कंपन्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये उतरल्या आहेत. तर काही कंपन्या लवकरच त्यांची इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च करणार आहेत.
मुंबई : गेल्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांचं (Electric Vehicle) सेगमेंट झपाट्याने विस्तारलं आहे आणि अनेक कंपन्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये उतरल्या आहेत. तर काही कंपन्या लवकरच त्यांची इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च करणार आहेत. अलीकडेच प्रीमियम कार निर्माता कंपनी मर्सिडीजने आपली इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली आहे आणि आता लवकरच रोल्स रॉयस (Rolly Royce) देखील आपली इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे. ही कार नुकतीच पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये तिचे डिझाइन आणि लुक रिव्हील झाला आहे. वास्तविक, लक्झरी वाहन निर्माता कंपनी Rolls-Royce आपली पहिली इलेक्ट्रिक कार स्पेक्टर (Specter) च्या अधिकृत लॉन्चिंगसाठी सज्ज आहे. सध्या या कारचं टेस्टिंग सुरु आहे. टेस्टिंगदरम्यान ही कार पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही कार 2023 मध्ये लाँच केली जाऊ शकते.
Rolls-Royce EV Specter ची जर्मनीतल्या रस्त्यांवर चाचणी केली जात आहे. तथापि, टेस्टिंगदरम्यान दिसलेली कार कव्हर केली गेली होती जेणेकरून कारचं एक्सटीरियर, डिझाईन उघड होऊ नये. मात्र तरीदेखील या कारचे फोटो व्हायरल झाले आहेत.
115 वर्ष जुन्या ऑटोमोटिव्ह धोरणात बदल
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, लक्झरी कार निर्मात्या कंपनीने अधिकृतपणे पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली होती. कंपनीने 115 वर्ष जुन्या ब्रिटीश ऑटोमोटिव्ह धोरणात मोठा बदल केला. स्पेक्टर ईव्ही 2023 मध्ये उत्पादनात जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर या कारचं कमर्शियल व्हर्जन बाजारात दाखल होऊ शकतं.
Rolls-Royce Wraith सारखं डिझाईन
Rolls-Royce EV Specter चं डिझाईन पाहता ही कार मोठ्या कूपसारखी दिसते. हे डिझाइन ब्रिटीश लक्झरी कार निर्मात्या कंपनीचे दुसरे लोकप्रिय मॉडेल Wraith वरून प्रेरित असल्याचे दिसते. कंपनीच्या इतर गाड्यांच्या तुलनेत या कारचं ग्रिल थोडं मोठं आहे, ज्यामुळे कारला अधिक आकर्षक लुक मिळतो.
ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स
Rolls-Royce Specter च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने या कारबद्दल अधिकृतपणे कोणतेही स्पेसिफिकेशन्स उघड केलेले नाहीत. पण काही रिपोर्ट्सनुसार, Specter EV ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह सादर केली जाऊ शकते.
पॉवरफुल कार
Rolls-Royce ची पहिली इलेक्ट्रिक कार 600 हॉर्सपॉवर आणि 765 Nm पीक टॉर्क निर्माण जनरेट करु शकते. Rolls-Royce द्वारे Specter साठी वापरलेल्या बॅटरी पॅकबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
इतर बातम्या
तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…
लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज