AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield Super Meteor 650 vs Interceptor 650 यामध्ये नेमकं अंतर काय? जाणून घ्या

Royal Enfield: कंपनीच्या दोन गाड्यांबाबत ग्राहकांमध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे. दोन्ही 650 सीसी गाड्या असल्याने नेमकी निवडावी कोणती असा प्रश्न पडला. चला जाणून घेऊयात Super Meteor 650 आणि Interceptor 650 या गाड्यांमधील फरक

Royal Enfield Super Meteor 650 vs Interceptor 650 यामध्ये नेमकं अंतर काय? जाणून घ्या
Royal Enfield Super Meteor 650 vs Interceptor 650 या दोन गाड्यांमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या खासियत Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 6:43 PM

मुंबई- भारतीय बाजारात दुचाकी गाड्यांची क्रेझ सर्वश्रूत आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांची मागणी पाहता एकापेक्षा एक सरस असा दुचाकी भारतात लाँच केल्या जात आहेत. असं असताना रॉयल एनफिल्डची क्रेझ काही वेगळीच आहे. नुकतीच रॉयल एनफिल्डने मार्केटमध्ये Super Meteor 650 बाइक लाँच केली आहे. मात्र रॉयल एनफिल्डचे चाहते या गाडीची तुलना Interceptor 650 शी तुलना करत आहेत. नेमकं या दोन गाड्यांमध्ये फरक काय? असा प्रश्न बाइकप्रेमींना पडला आहे. या दोन्ही गाड्यांची किंमत, डिझाईन आणि इंजिनची वैशिष्ट्य पाहता एका गाडीची निवड करणं सोपं होईल. आज आम्ही तुम्हाला Royal Enfield Super Meteor 650 आणि Interceptor 650 या बाइकचं वैशिष्ट्य सांगणार आहोत, जेणेकरून दोनपैकी एक गाडी निवडताना संभ्रम होणार नाही.

Royal Enfield Super Meteor 650 आणि Interceptor 650  डिझाईन

रॉयल एनफिल्डच्या दोन्ही गाड्या बघितल्या बघितल्या प्रेमात पडायला होतं. सुपर मेट्योर 650 ही बाइक क्रुझर बाइकसारखी आहे. ही गाडी पाहिल्यानंतर रेट्रो लूक भावतो. फुटपेग्स पुढच्या बाजूला असून गाडी चालवताना अडचण येऊ शकते. गाडीची सवय झाली की, हा प्रश्न तसा उद्भवणार नाही. इंटरसेप्टर 650 काही ब्रिटीश मोटारसायकलसारखी रोडस्टर पॅटर्न आहे. पण आपला रेट्रो लूकमुळे आकर्षित दिसतील. रायडिंग पोश्चर हँडलबार्सकडे झुकलेलं असून फुटपेग्स मागच्या बाजूला सेट आहेत. इंटरसेप्टरमध्ये एक ट्रिम असून सुपर मेट्योरमध्ये तीन व्हेरियंट आहे. या व्हेरियंटमध्ये एस्ट्रल, इंटरस्टेलर आणि सेलेस्टियल यांचा समावेश आहे.

Royal Enfield Super Meteor 650 आणि Interceptor 650 किंमत

किंमतीच्या बाबतीत म्हणायचं तर मेट्योर ही इंटसेप्टरपेक्षा महाग आहे.इंटरसेप्टर या गाडीची किंमत 2.89 लाख (एक्स शोरुम) रुपयांपासून सुरु होते. तर सुपर मेट्योरची सुरुवात 3.49 लाखांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. या दोन्ही किमतींमध्ये जवळपास 60 हजार रुपयांचं अंतर आहे.

Royal Enfield Super Meteor 650 आणि Interceptor 650 इंजिन

रॉयल एनफिल्ड सुपर मेट्योर 650 मध्ये 648 सीसी, एअर/आयल कुल्ड पॅरेलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 47 बीएचपी आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तर इंटरसेप्टर ही गाडी 648 सीसी, एअर/ऑयल कुल्ड पॅरेलल ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 47 बीएचपी आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.