लाँचिंगनंतर काही दिवसांनी रॉयल एनफिल्डला टक्कर देत ट्रायम्फची ‘ही’ बाईक सवलतीत उपलब्ध
रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ट्रायम्फ मोटरसायकल्सने काही महिन्यांपूर्वी ४०० सीसीमध्ये एक बाईक लाँच केली होती. आता कंपनी डिसेंबरमध्ये मोठ्या सवलतीसह या बाईकची विक्री करत आहे. या बाईकची वैशिष्ट्येही अप्रतिम आहेत.
तुम्हाला ही नवीन वर्षात नवीन बाईक घायची असेल तर ही बाईक तुम्ही खरेदी करू शकता. त्यात तुम्हाला धमाकेदार सवलत देखील देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला बजेटमध्ये नवीन बाईक घेता येईल. यातच 350 सीसी आणि 400 सीसी या सेगमेंटच्या बाईक आता देशात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. त्यातच रॉयल एनफिल्ड या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे, तर रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी ट्रायम्फ, जावा, येज्दी आणि होंडा सारख्या अनेक कंपन्यांनी बाजी मारली आहे. ट्रायम्फ मोटरसायकल्सने 3 महिन्यांपूर्वी 400 सीसी सेगमेंटमध्ये एक नवीन बाईक लाँच केली होती, जी आता डिसेंबर महिन्यात मोठ्या सवलतीत उपलब्ध केली आहे.
बजाज ऑटो ही कंपनी भारतात ट्रायम्फ बाईक ची निर्मिती करते. आपल्या 400 सीसी लाइनअप वाढवत Speed 400 ची सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारी Triumph Speed T4 ही बाईक काही महिन्यांपूर्वी लाँच केली होती, जी आता कंपनीकडून धमाकेदार सवलतीत विकली जात आहे. कंपनीने ही बाईक सप्टेंबर 2024 मध्येच लाँच केली होती.
ट्रायम्फची सर्वात स्वस्त बाईक
Triumph Speed T4 ही कंपनीची सर्वात स्वस्त व परवडणारी बाईक आहे. कंपनीने याला सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत 2.17 लाख रुपयांमध्ये लाँच केली होती. दरम्यान Triumph Speed T4 हि बाईक बाजारात असलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० आणि रॉयल एनफिल्ड स्क्रॅम ४११ ची ही थेट प्रतिस्पर्धी आहे. या बाईकमध्ये तुम्हाला ३९८ सीसीचे इंजिन मिळते. हे इंजिन 30.6 बीएचपीपॉवर आणि 36 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
याशिवाय कंपनी यात इतरही अनेक फीचर्स देते. ज्यात तुम्हाला 6-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे. हे ट्यूबलर स्टील फ्रेमवर विकसित करण्यात आले आहे. यात १७ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर कंपनी टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशनदेखील देते. याची पेट्रोलची टाकी १३ लिटरची आहे, जी लाँग राइडवर जाण्यास तुम्हाला मदत करते.
धमाकेदार डिस्काउंट ऑफर
डिसेंबर महिन्यात कंपनी Triumph Speed T4 या बाईकवर वर्षअखेरची सूट देत आहे. तर तुम्हाला या बाईकवर चक्क 18,000 रुपयांची धमाकेदार सूट देत आहे, ज्याची एक्स शोरूम किंमत आता 1.99 लाख रुपये झाली आहे. या सेगमेंटमध्ये बाईकची विक्री वाढविणे आणि ट्रायम्फची एकूण विक्री दरमहा १०,००० युनिट्सपर्यंत नेणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.