Royal Enfield ची प्रतिस्पर्धी ‘या’ बाईकसोबत 12,500 रुपयांच्या वस्तू फ्री

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्ससोबत (Triumph Scrambler 400 X) ग्राहकांना आता 12,500 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. हे बाईकच्या खरेदी किंमतीत समाविष्ट केले जाईल.

Royal Enfield ची प्रतिस्पर्धी ‘या’ बाईकसोबत 12,500 रुपयांच्या वस्तू फ्री
Triumph Scrambler 400 X
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 7:11 PM

रॉयल एनफिल्डची मजाच काही वेगळी आहे. बाईक घ्यायची तर रॉयल एनफिल्ड हीच घ्यावी, अशी चर्चाही तरुण मंडळींमध्ये असते. पण, याला टक्कर देणारी किंवा प्रतिस्पर्धी बाईक तुम्हाला माहिती आहे का? हे सांगण्याचं कारण म्हणजे या बाईकवर आता तुम्हाला चांगले गिफ्ट मिळू शकतात.

400 सीसीपर्यंतचे दमदार इंजिन

बाईकर्स आणि रोड ट्रॅव्हलर्समध्ये रॉयल एनफिल्ड हिमालयनची जबरदस्त प्रतिस्पर्धी बाईक देखील भारतीय बाजारात आहे. तसेच यात 400 सीसीपर्यंतचे दमदार इंजिन देण्यात आले आहे. आता या बाईकसोबत कंपनी 12,500 रुपयांच्या वस्तू मोफत देत आहे.

हजारो रुपयांच्या वस्तू मोफत

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स (Triumph Scrambler 400 X) बाईक दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. बजाज ऑटो या बाईकची निर्मिती भारतात करते. या बाईकमुळे आता हजारो रुपयांच्या वस्तू मोफत मिळतात.

हे सुद्धा वाचा

‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’सह विनामूल्य अ‍ॅक्सेसरीज

फ्री अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचे झाले तर ‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’सोबत ग्राहकांना आता 12,500 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. हे बाईकच्या खरेदी किंमतीत समाविष्ट केले जाईल आणि त्यांच्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे कोणतेही पॅकेज घ्यावे लागणार नाही किंवा कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

लॉन्च कधी होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या बाईक ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्सचे परवडणारे व्हर्जन तयार करत आहे. हे नुकतेच रोड टेस्टिंगदरम्यान दिसून आले आहे. या बाईकमध्ये साधे तंत्रज्ञान आणि नवे इंजिन पाहायला मिळते. नव्या बाईकच्या लाँचिंगची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

बाईक कोणत्या रंगांमध्ये येणार?

‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’मध्ये आता लोअर इंजिन बार, हाय मडगार्ड किट, एक छोटी फ्लाय स्क्रीन, टँक पॅड, रियर लगेज रॅक आणि टॉप बॉक्स बेस प्लेट मोफत देण्यात आली आहे. उर्वरित बाईकमध्ये इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे तीन रंग पांढरा, लाल आणि मॅट ग्रीन रंगात आहेत.

किंमत 2.64 लाख रुपये

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’मध्ये ग्राहकाला 400 सीसी इंजिन मिळते. ट्रायम्फमधील ही सर्वात महागडी 400 सीसीची बाईक आहे. याचे इंजिन 40 एचपीपॉवर आणि 37.5 न्यूटनचा टॉर्क जनरेट करते. यात 19/17 इंचाचा व्हील सेट देण्यात आला आहे. याची एक्स शोरूम किंमत 2.64 लाख रुपये आहे.

लक्षात घ्या की, ‘ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 एक्स’सोबत ग्राहकांना 12,500 रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे हा तुमचा फायदा होऊ शकतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.