Royal Enfield धुरळा उडवणार! नवी दमदार बाईक बाजारात येणार

Royal Enfield कंपनी लवकरच भारतात पाच नव्या बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक बाईक लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

Royal Enfield धुरळा उडवणार! नवी दमदार बाईक बाजारात येणार
Hunter 350 Photo- Zigwheels
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 11:41 AM

मुंबई : Royal Enfield ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात. तुम्हीसुद्धा आता नवीन बाईक खरेदी करणार असाल तर थोडी वाट पाहा. ही वाट पाहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण Royal Enfield कंपनी लवकरच भारतात पाच नव्या बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक बाईक लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज असून थोड्याच दिवसात ही बाईक लाँच केली जाऊ शकते. (Royal Enfield Hunter 350 is going to launch soon know features and specification)

Royal Enfield कंपनी आता Hunter 350 ही बाईक बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. नुकीतच टेस्टिंगदरम्यान ही बाईक पाहायला मिळाली आहे. Hunter 350 या बाईकच्या लाँचिंगबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु टेस्टिंगदरम्यान जेव्हा ही बाईक पाहायला मिळाली त्यावरुन असं कळतंय की, या बाईकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अॅनालॉग स्पीडोमीटर आणि LCD देण्यात आली आहे. यावर बाईकचं स्पीड, टाईम इत्यादी माहिती पाहायला मिळेल. परंतु कंपनीने या बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉड दिलेलं नाही. असं म्हटलं जातंय की, हे फीचर नव्या बाईकमध्ये दिलं जाणार नाही.

Meteor 350 सारखंच डिझाईन

या नव्या बाईकचं डिझाईन सध्याच्या Meteor 350 या बाईकशी मिळतंजुळतं आहे. तसेच असं म्हटलं जातंय की, या बाईकचा Royal Enfield च्या एंट्री लेव्हल पोर्टफोलियोमध्ये समावेश केला जाईल. याचाच अर्थ या बाईकची किंमत कमी असेल. या बाईकमध्ये कंपनीने रेट्रो स्टाईल राऊंड शेप हेडलाईट, वोलोमाइन फ्युल टँक, सिंगल पीस सीट, स्प्लीट ग्रॅब रेलचा समावेश करण्यात आला आहे.

रॉयल एनफिल्ड Hunter 350 मध्ये 349cc चं इंजिन मिळणार

नवीन Hunter 350 बाईकच्या इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 349cc क्षमते सिंगल सिलिंडरयुक्त इंजिन मिळेल. हे इंजिन 20 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स मिळेल. कंपनी या बाईकच्या फ्युल टँकच्या डिझाईनमध्ये बदल करु शकते. तसेच एका वेगळ्या पेंट स्कीमसह ही बाईक बाजारात लाँच केली जाऊ शकते. ही बाईक कंपनीच्या नवीन J प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा

Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जवान फक्त Royal Enfield बाईक्स का वापरतात?

बुलेटप्रेमींसाठी मोठी बातमी, किमती बदलल्या, बुलेट स्वस्त की महाग?

रॉयल एन्फिल्डच्या ग्राहकांना कंपनीकडून खुशखबर

नुसता धुर्र! Royal Enfield लवकरच 5 दमदार बाईक भारतात लाँच करणार

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

(Royal Enfield Hunter 350 is going to launch soon know features and specification)

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.