Royal Enfield, Jawa ते Yezdi, 2022 मध्ये लाँच होणार एकापेक्षा एक टॉप क्लास क्रूझर बाईक

नवीन वर्ष 2022 मध्ये आपण अनेक नवीन रेट्रो-मोटारसायकल आणि क्रूझर्स पाहणार आहोत. Royal Enfield, Jawa आणि Yezdi सारखे ब्रँड यावर्षी भारतात एकापेक्षा एक शानदार क्रूझर बाईक लाँच करण्यासाठी सज्ज आहेत.

Royal Enfield, Jawa ते Yezdi, 2022 मध्ये लाँच होणार एकापेक्षा एक टॉप क्लास क्रूझर बाईक
Royal Enfield (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 3:55 PM

मुंबई : नवीन वर्ष 2022 मध्ये आपण अनेक नवीन रेट्रो-मोटारसायकल आणि क्रूझर्स पाहणार आहोत. Royal Enfield, Jawa आणि Yezdi सारखे ब्रँड यावर्षी भारतात एकापेक्षा एक शानदार क्रूझर बाईक लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. 2022 मध्ये अपेक्षित असलेल्या टॉप क्रूझर बाइक लॉन्चची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या यादीमध्ये रॉयल एनफिल्डच्या दोन बाइक्स आणि जावाच्या नवीन क्रूझरचा समावेश आहे. जावाकडे सध्या भारतात तीन मोटारसायकली आहेत, ज्यामध्ये जावा क्लासिक, फोर्टी टू आणि पेराक या गाड्यांच्या समावेश आहे. यापैकी पेराक एक बॉबर आहे तर इतर तीन रोडस्टर आहेत. तसेच यात Yezdi च्या क्लासिक बाईकचादेखील समावेश आहे. (Royal Enfield, Jawa and Yezdi to launch new cruiser bikes in India in 2022)

Jawa हा चेक ब्रँड आता भारतीय बाजारपेठेसाठी आणखी एका मोटरसायकलवर काम करत आहे. नवीन आगामी जावा बाईकची भारतामध्ये चाचणी करण्यात आली आहे आणि ती क्रूझर बाईकसारखी दिसते. Jawa ने या आगामी क्रूझर बाईकबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

रॉयल एनफील्ड हंटर 350

चेन्नई-आधारित बाईक निर्माता कंपनी 2022 च्या सुरुवातीला भारतात आपली हंटर 350 मोटरसायकल सादर करणार आहे. अलीकडच्या काळात मोटारसायकलच्या अनेक चाचण्या केल्या गेल्या आहेत आणि Scrum 411 मोटरसायकल नंतर विक्रीसाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे. हंटर 350 2020 च्या उत्तरार्धात भारतात लॉन्च झालेल्या मिटिओर 350 वर आधारित असेल.

नवीन जावा क्रूझर

जावाने आपल्या आगामी क्रूझरची टेस्टिंग सुरू केली आहे जी 2022 मध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे. हे मॉडेल Royal Enfield Meteor 350 ला कॉम्पिटिटर असेल आणि त्याची किंमत देखील त्याच प्राइस रेंजमध्ये असेल, अशी शक्यता आहे. या नवीन जावा क्रूझरबद्दल अधिक डिटेल्स लवकरच जारी केले जातील.

रॉयल एनफील्ड शॉटगन 650

कंपनीने आपली नवीन SG 650 कॉन्सेप्ट EICMA 2021 मध्ये सादर केली आणि 2022 च्या अखेरीस त्याच मॉडेलचं प्रोडक्शन व्हर्जन अधिकृतपणे भारतात सादर केलं जाईल, अशी शक्यता आहे. ही बाईक त्याच इंजिन आणि प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. रॉयल एनफिल्डचे सध्याचे 650cc मॉडेल आणि लॉन्च केल्यावर त्याची किंमत 3 लाख रुपये ते 4 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असेल.

2022 Yezdi Roadking

2022 मध्ये, येझदी ब्रँड रोडकिंग स्क्रॅम्बलर (Roadking scrambler) आणि त्याचे Adv sibling या अंतर्गत दोन मोटारसायकली लॉन्च करु शकतो. येझदी रोडकिंग स्क्रॅम्बलर आगामी रॉयल एनफिल्ड हंटरला टक्कर देईल. गोल हेडलॅम्प, फोर्क गेटर्स आणि टियरड्रॉप-शेप्ड फ्यूल टँक यासारख्या वैशिष्ट्यांसह दोन्ही बाइक्समध्ये निओ-रेट्रो स्टायलिंग आहे. स्पोक व्हील्सचा वापर या बाईकच्या क्लासी प्रोफाइलला आणखी आकर्षक करतो.

इतर बातम्या

टेस्लाच्या तब्बल 4.75 लाख गाड्यांमध्ये दोष? कंपनीने कार परत मागवल्या

Hero Pleasure ते Honda Dio, 2021 मधील देशातील टॉप 5 स्कूटर्स, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स

(Royal Enfield, Jawa and Yezdi to launch new cruiser bikes in India in 2022)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.