मुंबई : बाजारात रॉयल एनफिल्डच्या गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 मध्ये देखील ही खरेदीदारांची सर्वात आवडती मोटारसायकल कंपनी होती. ताज्या माहितीनुसार, कंपनीने डिसेंबरमध्ये एकूण 73,739 युनिट्सची विक्री केली आहे, जी 2020 च्या त्याच महिन्यात 68,995 युनिट्सपेक्षा जास्त होती. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत किरकोळ घट (-0.47%,) झाली आहे, मात्र निर्यातीत कंपनीने मोठी झेप घेतली आहे. (Royal Enfield sales increased up 7 percent beats Hero MotoCorp in market)
त्याच वेळी, Hero MotoCorp च्या घाऊक विक्रीत मोठी घट झाली आहे. रॉयल एनफिल्ड जपान आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांसह अनेक प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये वेगाने वाढत आहे.
कंपनीची निर्यात गेल्या महिन्यात 8,552 युनिट्सवर होती, जी डिसेंबर 2020 मध्ये परदेशी बाजारपेठेत पाठवलेल्या 3,503 युनिट्सच्या तुलनेत 144.13% ने वाढली आहे. 2020 वर्षांच्या डिसेंबर महिन्यात देशांतर्गत विक्री खूप कमी झाली असताना, रॉयल एनफिल्डने गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान देशांतर्गत विक्रीच्या आकडेवारीत सुमारे 45% वाढ नोंदवली आहे.
रॉयल एनफिल्ड देशातील अनेक हाय सेलिंग मॉडेल ऑफर करते. या यादीमध्ये Classic 350, Bullet 350, Himalayan, Thunderbird 350X, Royal Enfield Meteor 350 यांचा समावेश आहे. अलीकडेच, कंपनी त्यांच्या लिमिटेड एडिशन अॅनिव्हर्सरी एडिशन ट्विन्स मोटरसायकलचे सर्व 120 युनिट्स दोन मिनिटांपेक्षा कमी विक्रमी वेळेत विकू शकली. लिमिटेड एडिशन 650 ट्विन्स युरोप, अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियामधील लोकांसाठी देखील उपलब्ध असतील.
कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या वाढणे ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे आणि सध्या लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि अधोरेखित केले आहे की दुचाकी सेगमेंट सर्वात जास्त प्रभावित होऊ शकतं.
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Hero MotoCorp ची एकूण घाऊक विक्री डिसेंबरमध्ये 12 टक्क्यांनी घसरून 3,94,773 युनिट्सवर आली आहे. कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये 4,47,335 युनिट्सची विक्री केली होती. देशांतर्गत बाजारात कंपनीची घाऊक विक्री डिसेंबर 2020 मध्ये 4,25,033 युनिट्सवरून 3,74,485 युनिट्सवर घसरली आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, Hero MotoCorp देखील यावर्षी मार्चमध्ये आपले पहिले इलेक्ट्रिक मॉडेल (EV) सादर करण्याच्या तयारीत आहे.
इतर बातम्या
Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत
Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा
ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत
(Royal Enfield sales increased up 7 percent beats Hero MotoCorp in market)