रॉयल एनफिल्ड भारतातील तीन मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट्स तात्पुरते बंद ठेवणार; जाणून घ्या यामागील नेमके कारण
रॉयल एनफिल्डचे संबंधित तिन्ही प्लान्ट्स दक्षिणी तामिळनाडू राज्यातील चेन्नई व आसपासच्या परिसरात आहेत. या परिसरांना भारताचे डेट्रॉईट म्हणून ओळखले जाते. (Royal Enfield will temporarily close three manufacturing plants in India; know the exact reason behind this)

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक ऑटो कंपन्यांना आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट्स बंद ठेवणे भाग पडले आहे. कोरोनाच्या संकटात नजिकच्या काळात दिलासा मिळेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांना टाळी लागली आहेत. हीच परिस्थिती ऑटो कंपन्यांवरही आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. संसर्गाच्या या चिंताजनक परिस्थितीत सुरक्षेचा उपाय म्हणून आयशर मोटर्स लिमिटेडची मालकी असलेल्या रॉयल एनफिल्डने आपले तीन दक्षिण भारतीय उत्पादन प्रकल्प तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Royal Enfield will temporarily close three manufacturing plants in India; know the exact reason behind this)
कोरोना संकटाचा या ब्रॅण्डलाही फटका
रॉयल एनफिल्ड अलिकडच्या काळात चांगलाच नावारुपाला आलेला ब्रॅण्ड आहे. जगातील सर्वात मोठी मोटारसायकल बाजार आणि भारताचा प्रसिद्ध ब्रॅण्ड म्हणून रॉयल एनफील्डने आपला दबदबा निर्माण केला आहे. मात्र कोरोना संकटाचा या ब्रॅण्डलाही फटका बसला आहे. रॉयल एनफिल्डने 27 मे ते 29 मे या कालावधीत आपले तीन उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्स व दोन सोर्सेसद्वारा एक इंटरनल नोटमधून या निर्णयाची माहिती पुढे आली आहे. रॉयल एनफील्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी गोविंदराजन यांची स्वाक्षरी असलेली इंटरनल नोट कामगारांसाठी जारी करण्यात आली आहे. आम्ही सोमवारपासून म्हणजेच 31 मेपासून तिन्ही उत्पादन प्रकल्प पूर्ववत सुरू करणार आहोत, असे कंपनीच्या इंटरनल नोटमध्ये म्हटले आहे.
याआधीही बंद करण्यात आले होते प्लान्ट्स
बी गोविंदराजन यांनी इंटरनल नोटमध्ये म्हटले आहे की, जेवढे दिवस उत्पादन प्रकल्प बंद राहणार आहेत, तेवढ्या दिवसांत कामगारांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. बाजारपेठेच्या गरजेनुसार संबंधित दिवसांची भरपाई केली जाईल, असे गोविंदराजन यांनी जाहीर केले आहे. रॉयल एनफिल्डचे संबंधित तिन्ही प्लान्ट्स दक्षिणी तामिळनाडू राज्यातील चेन्नई व आसपासच्या परिसरात आहेत. या परिसरांना भारताचे डेट्रॉईट म्हणून ओळखले जाते. रॉयल एनफिल्डने या महिन्याच्या सुरूवातीला 13 मे ते 15 मे या तीन दिवसांसाठीही प्लान्ट्स बंद ठेवले होते.
तामिळनाडूमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण
गेल्या आठवड्यात तामिळनाडू हे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरले होते. राज्यात प्रत्येक दिवसाला 30 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. भारतात ऑटो मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्सचे डेट्रॉईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑटो हब तामिळनाडूने 31 मे पर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. परंतु ऑटो प्लांट्ससह काही कारखान्यांना काम चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
ह्युंदाईनेसुद्धा तामिळनाडूतील प्लान्ट केला बंद
यापूर्वी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) तामिळनाडूतील आपल्या प्लाण्टचे कामकाज 29 मे 2021 पर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरियन कार निर्माता कंपनी पुढच्या महिन्यात भारतात आपली पहिली थ्री रो स्पोर्ट्स कार अल्काजार बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान ह्युंदाई मोटार इंडियाला तामिळनाडूतील प्लान्टचे कामकाज तात्पुरते बंद ठेवावे लागले आहे. याचा नवीन 7 सीटर एसयूव्हीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. (Royal Enfield will temporarily close three manufacturing plants in India; know the exact reason behind this)
Covid vaccine scam : ‘मुंबई महापालिकेचा कोरोना लस घोटाळा’, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, शिवसेना काय उत्तर देणार? https://t.co/EFBHl8J0Be @KiritSomaiya @BJP4Maharashtra @bjp4mumbai @OfficeofUT @AUThackeray @KishoriPednekar #mumbaicovid #CoronaVaccine #GlobalTender #KiritSomaiya
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2021
इतर बातम्या
Gold Rate Today: सोने आज पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव