Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kia EV6 : कियाची सगळ्यात तगडी कार, सेफ्टी रेटिंगमध्ये 6 पैकी 5 स्टार, फिचर्सची लिस्ट बातमीत तयार!

किआने आपल्या इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही 6 मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स दिले आहे.

Kia EV6 : कियाची सगळ्यात तगडी कार, सेफ्टी रेटिंगमध्ये 6 पैकी 5 स्टार, फिचर्सची लिस्ट बातमीत तयार!
Kia EV6Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:33 PM

मुंबई : किआ लवकरच भारतात आपली लेटेस्ट इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही 6 (Kia EV6) लाँच करणार आहे. कारच्या लाँचिंगआधीच या कारच्या फीचर, स्पेसिफिकेशन्स आणि लूकबाबत विविध दावे करण्यात येत आहे. आता नवीन अपडेटमध्ये किआने आपल्या इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही 6 मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स दिले आहे. युरो एनसीएपीमध्ये (NCAP) कारला 5 स्टार क्रॅश रेटींग देण्यात आले आहे. टेस्टिंग एजेंसीच्या मते, किआच्या क्रॅश चाचणी दरम्यान, क्रोसओव्हरने ॲडल्ट प्रोटेक्शनमध्ये 90 टक़्के स्कोअर मिळवला आहे. किआ ईव्ही 6 ला मुलांच्या सुरक्षेसंदर्भात 86 टक्के गुण देण्यात आले आहे. ही कार लवकरच भारतात बुकिंगसाठी (Booking) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ही कार भारतात लिमिटेड संख्येत उपलब्ध होणार आहे.

किआ ईव्ही 6 ची भारतात लाँचिंग पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. ईव्ही 6 साठी ओव्हरऑल सिक्यूरिटी सपोर्ट 87 टक़्के मोजण्यात आला आहे. ईव्ही 6 चे पॅसेंजर कंपार्टमेंट फ्रंटल ऑफसेट टेस्टमध्ये स्टेबल राहिले. डमी रीडिंगने चालक आणि प्रवाशांचे गुडघे आणि फीमरला चांगली सेफ्टी दिली. किआच्या या कारमध्ये विविध साइज तसेच विविध पोजिशनमध्ये बसलेल्या लोकांनाही एकसारखी सेफ्टी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

जाणून घ्या सेफ्टी फीचर्स

कारमध्ये मागील प्रवाशांच्या छातीला सोडून, ड्रायव्हर आणि मागील सीटवर बसलेले प्रवासी या दोघांच्या शरीराला संपूर्णपणे सेफ करण्यात आले होते. साइड बेरियर टेस्ट आणि सिव्हियर पोल प्रभाव दोन्हीमध्ये, शरीरातील सर्व क्रिटिकल बॉडी एरियाची सुरक्षा चांगली आहे. या सेफ्टीतही कारला चांगले मार्क देण्यात आले आहे. ईव्ही 6 मध्ये ॲडव्हान्स eCall सिस्टम आहे. ज्या माध्यमातून दुर्घनेच्या स्थितीमध्ये आपत्कालिन सेवांना अलर्ट करण्यात येत असते. कारमध्ये एक सिस्टमदेखील देण्यात आली आहे. जी एका प्रभावानंतर ब्रेक लावत असते.

फ्रंट ऑफसेट टेस्टमध्ये, शरीराच्या सर्व गरजेच्या भागांना सुरक्षेला 6 आणि 10 वर्षाच्या डमी अशा दोघांना चांगले मानले गेले आहे. ईव्ही 6 मध्ये एक ऑटोनोमस इमरजंसी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. या माध्यमातून तकलादू रस्ता युजर्ससह दुसर्या वाहनांनाही फीडबॅक देउ शकणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ईव्ही 6 कारला चांगले गुण देण्यात आले आहेत.