Second Hand Car | सेकंड हँड कारच्या रिपेंटला ‘असे’ ओळखा अन् नुकसानीपासून वाचा
Second Hand Car | भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सेकंड हँड कारची खरेदी करण्याआधी ग्राहकांनी काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते. कारवर पेंट केलेले कुठल्याही प्रकारचे स्पॉट नसायला हवेत. डर्टी स्पॉटच्या माध्यमातून, कारमध्ये पेंटच्या खाली एकदम छोटा टिंब दिसून येतो.
Second Hand Car | सर्वसामान्यांच्या जीवनातही आता कार हा अविभाज्य घटक बनला आहे. कोरोना (Covid) काळात सर्वच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असताना अनेकांना आपल्या खासगी वाहनांचा मोठा आधार मिळाला होता. सुरक्षेच्या दृष्टीने त्या काळात अनेक लोकांनी आपल्या स्वतंत्र्य कारदेखील खरेदी केल्यात. परंतु अनेकांना नवीन कार परवडेलच असे नाही. त्यामुळे अनेक ग्राहक सेकंड हँड कारची खरेदी करीत असतात. त्यामुळे नवीन कारसोबत भारतात सेकंड हँड कारलादेखील (second hand car) मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. परंतु सेकंड हँड कारची खरेदी करताना कार चांगली पारखून घ्यावी लागत असते. कारला डेंट, पेंट काही अपघात तर नाही झालाय? याची माहिती घ्यावी लागत असते. पेंटचा विचार करताना आपण या लेखातून काही टीप्स (Tips) देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही कार खरेदी करताना कारला किती पेंट केलाय? याची तत्काळ माहिती घेउ शकणार आहात.
1) भारतीय ऑटोमोबाईल बाजारामध्ये सेकंड हँड कारचा सेगमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात, महागडी बीएमडब्ल्यूपासून ते मारुती अल्टो कारपर्यंत सर्वच वेगवेगळ्या कार्सचा समावेश होत आहे. परंतु ग्राहक नेहमी कारच्या बाहेरील रंगरंगोटीला बळी पडत असतो. परंतु त्या रंगरंगोटीच्या आतमध्ये खरे रहस्य एखाद्या जानकार व्यक्तीलाच ओळखता येत असते. त्यासाठी काही खास टीप्स माहिती करुन घेणे आवश्यक असते.
2) एखाद्या कारला जर रिपेंट केले असेल तर ती जागा गाडीच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये अधिक ओबडधोबड दिसून येईल. अशामध्ये तुम्ही कारच्या इतर भागातील कलर व रिपेंट केलेल्या भागातील कलर याचा फरक ओळखून कारला किंती प्रमाणात रिपेंट केली आहे, याची माहिती मिळवू शकतात.
3) कारचे किनारे आणि सर्व शार्प भागांना चांगल्या पध्दतीने तपासून पहावे. खरेतर कंपनीच्या माध्यमातून कारमध्ये एक शार्प कट आउट बाडी दिली जाते. परंतु अनेक वेळा युजर्स एक्सीडेंटनंतर त्या कटला मोडून टाकत असतात. अशात पुन्हा पेंट केल्यावर देखील ते नीट होत नाहीत. किंवा चांगले झालेच तर ते आपल्या निशानी ठेवून जात असतात. त्यामुळे ते त्वरित ओळखले जात असतात.
4) सेकंड हँड कारची खरेदी करीत असताना संपूर्ण कारच्या रंगाचे निरीक्षण करावे, कुठे गाडीला जास्त चमक तर कुठे कमी चमक दिसून येईल. जास्त चमकदार भाग हा रिपेंट केलेला असून शकतो. या शिवाय रिपेंट केलेल्या भागाला पाण्यामुळे पोपडे येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ते सहज पध्दतीने ओळखता येते.