बहुप्रतीक्षित Simple One Electric Scooter च्या वितरणाची तारीख ठरली, कंपनीला 30000 हून अधिक ऑर्डर्स

देशातील सर्व EV चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सिंपल एनर्जीने (Simple Energy) घोषणा केली आहे की ते लवकरच भारतात सिंपल वन ई स्कूटरची (Simple One e scooter) डिलिव्हरी सुरू करतील.

बहुप्रतीक्षित Simple One Electric Scooter च्या वितरणाची तारीख ठरली, कंपनीला 30000 हून अधिक ऑर्डर्स
Simple One Electric Scooter
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 4:48 PM

मुंबई : देशातील सर्व EV चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सिंपल एनर्जीने (Simple Energy) घोषणा केली आहे की ते लवकरच भारतात सिंपल वन ई स्कूटरची (Simple One e scooter) डिलिव्हरी सुरू करतील. या भारतीय ईव्ही निर्मात्या कंपनीने शेअर केले आहे की, ते जून 2022 पासून ग्राहकांना त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे वितरण सुरू करतील. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.1 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे, गेल्या वर्षी ऑगस्टपासून या स्कूटरसाठी बुकिंग्स घेण्यास कंपनीने सुरुवात केली होती. ग्राहक 1,947 रुपये टोकन अमाऊंट भरुन ही स्कूटर बुक करु शकतात. ऑगस्टपासून आतापर्यंत सिंपल एनर्जीला त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 30,000 हून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. (Simple One electric scooter’s delivery will start from June 2022)

सिंपल एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) 4.8 kWh पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह सुसज्ज आहे, या बॅटरीचं वजन 6 किलोपेक्षा जास्त आहे. या स्कूटरच्या डिटॅचेबल आणि पोर्टेबल नेचरमुळे ई-स्कूटरची बॅटरी घरी चार्ज करणे सोपे होईल. साध्या लूप चार्जरने जरी ही स्कूटर चार्ज केली तरी 60 सेकंदांच्या चार्जिंगवर ही स्कूटर 2.5 किमीपर्यंत धावेल. EV कंपनी पुढील तीन ते सात महिन्यांत देशभरात 300 हून अधिक फास्ट चार्जरदेखील स्थापित करेल.

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज, परफॉर्मन्स

ई-स्कूटर सिंगल चार्जमध्ये इको मोडमध्ये 203 किलोमीटर आणि आयडीसी स्थितीत 236 किलोमीटरची रेंज प्रदान करेल. या स्कूटरचं टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतकं आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रति तास, 0 ते 40 किमी प्रति तास वेग 2.95 सेकंदात धारण करु शकते. स्कूटरला 4.5 KW चे पॉवर आउटपुट आणि 72 Nm चे टॉर्क मिळते.

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स

इलेक्ट्रिक स्कूटर फ्यूचरिस्टिक डिझाईनला सपोर्ट करेल आणि मिड-ड्राइव्ह मोटरवर आधारित असेल. यात 30 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे, 12-इंचांची चाके, 7-इंचांचा डिजिटल डॅशबोर्ड, ऑन-बोर्ड नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग, एसओएस मेसेज, डॉक्यूमेंट स्टोरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल.

सिंपल वन ई-स्कूटर रेड, व्हाइट, ब्लॅक आणि ब्लू अशा चार कलर ऑप्शनमध्ये येते. सिंपल वन ई-स्कूटर Ather, हिरो इलेक्ट्रिक, ओकिनावा आणि ओला इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

इतर बातम्या

सिंगल चार्जमध्ये 250KM रेंज, इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या महिन्यात बाजारात

Yezdi ची नवीन मोटारसायकल उद्या बाजारात, रॉयल एनफील्डला टक्कर

शानदार ऑफर! 4.50 लाखांची मारुती कार 2.84 लाखात खरेदीची संधी

(Simple One electric scooter’s delivery will start from June 2022)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.