Online Car Insurance | घरबसल्या 2 मिनिटात समजेल कार इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम, फक्त नोट करा ‘या’ गोष्टी
Car Insurance Premium Online: तुम्हाला तुमच्या कारच इन्शुरन्स काढायचा आहे. पण एजंटची मदत घ्याची नाहीय. तर, तुम्ही कस घरबसल्या कार इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेट करु शकता, त्या बद्दल जाणून घेऊया.
मुंबई : वाहनासंदर्भातील काही कामांसाठी आपल्याला एजंटची मदत घ्यावी लागते. यात इन्शुरन्स प्रीमियम सुद्धा येतो. तुम्ही एजंटच्या मदतीशिवाय घर बसल्या Car Insurance Premium कसा चेक करु शकता, ते जाणून घ्या. गाडीचा इन्शुरन्स प्रीमियम जाणून घेण्यासाठी तुमचा जास्त वेळ खर्च होणार नाही. तुम्हाला भरपूर ऑनलाइन Car Insurance Calculator मिळतील. ज्याद्वारे तुम्ही तुमची प्रीमियम अमाऊंट जाणून घेऊ शकता. अनेक वेबसाइट्सकडून ऑनलाइन कार इन्शुरन्स कॅलक्युलेटरची सुविधा ऑफर केली जाते. यात पॉलिसी बाजार, ACKO, Bajaj Allianz, डिजिट इन्शुरन्स वेबसाइट्स आहेत. एकूण जितक्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रीमियम चेक करण्यासाठी कॅलक्युलेटरची सुविधा मिळेल.
असा समजेल तुम्हाला प्रीमियम
1 सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कारचा नंबर टाकावा लागेल.
2 त्यानंतर तुम्हाला नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीची माहिती मागितली जाईल. प्रत्येक वेबसाइटवर इतकी माहिती मागितली जात नाही. काही वेबसाइट्सवर तुमच्याकडे फक्त नंबर मागितला जाईल.
3 मोबाइल नंबर, नाव आणि ई-मेल आयडीचे डिटेल शेअर केल्यानंतर तुम्हाला IDV Value निवडण्यासाठी तुम्हाला एक मीटर दिलेलं असतं. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करु शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जितकी IDV Value वाढवणार, तितकी प्रीमियमची रक्कम वाढत जाईल.
4 IDV Value निवडल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. जसं की, तुम्हाला कुठली इन्शुरन्स पॉलिसी हवी आहे. Comprehensive की, थर्ड पार्टी इन्शुरन्स. या प्रश्नाच उत्तर दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या कारच्या इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम समजेल. एक गोष्टी इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ज्या वेबसाइट्स तुम्हाला घरबसल्या ऑनलाइन कार इन्शुरन्स प्रीमियम कॅलक्युलेट करण्याची संधी देतात, त्या साइट्स तुमच्याकडे मोबाइल नंबरची मागणी करतात. मोबाइल नंबर दिल्यानंतर या सर्व कंपन्यांच्या डेटा बेसमध्ये तुमचा नंबर रजिस्टर होतो. त्यानंतर कंपन्यांकडून तुम्हाला फोन येतात, ज्यात वेगवेगळ्या प्लान बद्दल तुम्हाला माहिती दिली जाते.