Skoda ची ढासू SUV Kushaq चं उत्पादन सुरु, ‘या’ दिवशी लाँच होणार

स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) सोमवारी जाहीर केले की, त्यांनी आपल्या नवीन एसयूव्ही कुशकचे (Skoda Kushaq) उत्पादन सुरू केले आहे.

Skoda ची ढासू SUV Kushaq चं उत्पादन सुरु, 'या' दिवशी लाँच होणार
2021 Skoda Kushaq
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 10:42 PM

मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) सोमवारी जाहीर केले की, त्यांनी आपल्या नवीन एसयूव्ही कुशकचे (Skoda Kushaq) उत्पादन सुरू केले आहे. ही एसयूव्ही या महिन्याच्या शेवटी बाजारात दाखल केली जाईल आणि जुलैमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. हे नवीन मॉडेल कंपनीच्या इंडिया 2.0 प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलं आहे. या कारचे उत्पादन स्कोडा फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या पुण्यातील चाकण येथील प्लांटमध्ये सुरु करण्यात आले आहे. (Skoda started production of its new SUV kushaqm will launch at end of June 2021)

लेटेस्ट डेव्हलपमेंटनुसार, कार निर्माता कंपनी जूनच्या शेवटी स्कोडा कुशक (Skoda Kushaq) एसयूव्हीची किंमत आणि तपशीलवार माहिती जाहीर करू शकते. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी Kushaq ही कार अधिकृतपणे 18 मार्च रोजी भारतात सादर करण्यात आली होती. परंतु अद्याप ही गाडी उपलब्ध झालेली नाही. ट्विटरवर काही युजर्सनी या कारच्या लाँच टाईमलाईनबाबत कंपनीला सवाल केले होते. त्यानंतर यापैकी एका युजरला स्कोडा ऑटो इंडियाचे संचालक झॅक हॉलिस यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. हॉलिस म्हणाले की, “पुढील महिन्याच्या शेवटी सर्व किंमती आणि फीचर्सची घोषणा केली जाईल. बुकिंग एकाच वेळी सुरु केलं जाईल आणि जुलैमध्ये वितरण (डिलीव्हरी) सुरू केलं जाईल.”

कशी आहे Skoda Kushaq?

Skoda Vision In Concept या कारने ऑटो एक्सपो 2020 मध्ये जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं होतं. अखेर या कारला नाव आणि ओळख मिळाली आहे. कंपनीने या कारला स्कोडा कुशक (Skoda Kushaq) असं नाव दिलं आहे. कंपनीने कुशक हा शब्द संस्कृत भाषेतून घेतला आहे. कुशक या शब्दाचा अर्थ आहे शासक, सम्राट किंवा राजा. ही व्हीकल मार्केटमध्ये ह्युंदाय क्रेटा आणि किया सेल्टॉस या गाड्यांना टक्कर देणार आहे. या मॉडेलचं लेटेस्ट अपडेट कंपनीने सादर केलं आहे. ही कार फोक्सवॅगन ग्रुपच्या ‘इंडिया 2.0’ प्रोजेक्टअंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली कार आहे.

कसं असेल इंटीरियर?

दरम्यान, स्कोडा ऑटो इंडियाने त्यांच्या आगामी कॉम्पॅक्ट एसयूव्ही, स्कोडा कुशकच्या इंटीरियरचे डिझाईन स्केच जाहीर केले. मध्यभागी इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि 2021 स्कोडा सुपर्बमध्ये दिसणारे स्टायलिश 2-स्पोक स्टीयरिंग व्हीलचा समावेश करण्यात आला आहे. या कारच्या केबिनचे मुख्य आकर्षण 10 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन असेल, जी Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारख्या फीचर्ससह मिळेल. कुशक एका मोठ्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या एअर-कॉन व्हेंट्ससह, प्रशस्त केबिनसह येईल.

कंपनीने अद्याप या कारच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. ही कार भारतीयांना परवडणारी असेल, असं म्हटलं जात आहे. नुकतीच या कारची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. या शानदार SUV च्या प्रोडक्शन मॉडलची एक झलक स्केचच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. कंपनीने नुकतचं या कारचं एक स्केच जारी केलं आहे. ज्यामध्ये या कारचं डिझाईन पाहायला मिळालं.

स्कोडा कुशकचं डिझाईन

भारतीय बाजारात स्कोडा कुशकचं जे डिझाईन सादर झालं आहे, हे डिझाईन 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलेल्या स्कोडा व्हिजन इन कॉन्सेप्टवरुन प्रेरणा घेत बनवलं आहे. या डिझाईनवरुन लक्षात येतंय की, या कारच्या पुढच्या भागात दोन भागांमध्ये विभागलेल्या हेडलाईट्स मिळतील. अंडरराईड सुरक्षा असलेलं बम्पर या एसयूव्हीला अॅथलेटिक लुक प्रदान करतं. कारचं बोनेटही जबरदस्त दिसेल असंच डिझाईन करण्यात आलं आहे. कारचं प्रोफाईल तुम्हाला कारोक आणि कोडियाकच्या डिझाईनची आठवण करुन देतं.

भारतीय बनावटीची कार

दरम्यान,कंपनीने म्हटलं आहे की, कुशक ही कार यावर्षी भारतात लाँच केली जाईल. ही कार 93 टक्के भारतीय बनावटीची आहे. कारण या कारमधील 93 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आले आहेत, अगदीच काही भाग परदेशातून आयात करण्यात आले आहेत. कंपनीने या व्हीकलच्या इंजिन ऑप्शन्स आणि डायमेंशनसह कम्फर्टवर बरंच काम केलं आहे. स्कोडा कुशक MQB-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये 2651 मिमीचं व्हीलबेस असेल जे स्कोडा कॉन्सेप्टच्या व्हीलबेसच्या तुलनेत 20 मिमी लहान आहे. कुशकच्या टॉप-एंड ट्रिम्समध्ये एलईडी हेडलाइट्स आणि डे टाईम रनिंग लाइट्सची (डीआरएलएस) सुविधा असेल. टेल आणि ब्रेक लाइट्सही देण्यात आल्या आहेत.

शानदार फिचर्स

ही भारतातील स्कोडाची पहिली कनेक्टेड कार असेल ज्यामध्ये MySkoda Connect टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये लेटेस्ट इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह 12.3 इंचांची सेंट्रल टच स्क्रीन दिली जाणार आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एयर कंट्रोल सिस्टिम, सनरुफ आणि अडॅप्टिव्ह लाईटसारखे फिचर्स दिले जाणार आहेत. कारच्या सुरक्षेबाबत बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 6 एयरबॅग्स (ऑप्शनल फ्रंट साईड एयरबॅग आणि कर्टेन एयरबॅग) असतील. तसेच सर्व ट्रिम्समध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) दिलं जाईल. तर टॉप-वेरिएंटमध्ये हिल-होल्ड कंट्रोल, रेन-लाईट सेन्सर, एक क्रुझ कंट्रोल सिस्टिम आणि टायर प्रेशर मॉनिटरही दिले जातील.

कुशक नावामागची कथा

स्कोडा कंपनीने कुशक या कारबाबत माहिती दिली आहे की, संस्कृत भाषा जगभरातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही आता भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. या नावाद्वारे कंपनी स्वतःला भारतीय उपमहाद्वीपाशी जोडू पाहतेय. तसेच ‘कुशक’ नावाचा अर्थ कंपनीच्या या मॉडलसाठी परफेक्ट आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे. ‘स्कोडा कुशक’ या नावाची घोषणा करताना कंपनीने ‘Make way for the one true king’ ही टॅगलाइनही दिली आहे.

इंडिया 2.0 प्रोजेक्ट

चेक प्रजासत्ताक (Czech Republic) देशातील आघाडीची कार निर्माती कंपनी स्कोडाने भारतातील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी इंडिया 2.0 प्रकल्पाची सुरुवात केली आहे. ‘कुशक’ ही स्कोडाची या प्रकल्पांतर्गत पहिली कार आहे. कंपनीने ही कार स्थानिक स्तरावरील Modulare Querbaukasten (MQB) A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवली आहे.

इतर बातम्या

इलेक्ट्रिक कार-बाईक खरेदीवरील खर्च कमी होणार, नव्या सुविधा मिळणार, सरकारचा नवा नियम

सिंगल चार्जवर 95Km रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात सर्वाधिक पसंती

(Skoda started production of its new SUV kushaqm will launch at end of June 2021)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.