Skoda Slavia चं महाराष्ट्रात प्रोडक्शन सुरु, 95 टक्के लोकलाइज्ड कार मार्च 2022 मध्ये बाजारात

स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) अधिकृतपणे त्यांच्या आगामी कॉम्पॅक्ट सेडान, स्कोडा स्लाव्हियाचे (Skoda Slavia) उत्पादन सुरू केले आहे. ही कार मार्च 2022 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Skoda Slavia चं महाराष्ट्रात प्रोडक्शन सुरु, 95 टक्के लोकलाइज्ड कार मार्च 2022 मध्ये बाजारात
Skoda Slavia Sedan
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 2:31 PM

मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) अधिकृतपणे त्यांच्या आगामी कॉम्पॅक्ट सेडान, स्कोडा स्लाव्हियाचे (Skoda Slavia) उत्पादन सुरू केले आहे. ही कार मार्च 2022 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवीन स्लाव्हिया हे कंपनीच्या लोकलाइज्ड MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित दुसरे मॉडेल आहे. याआधी कंपनीने स्कोडा कुशाक (Skoda Kusahq) कॉम्पॅक्ट SUV कार या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. स्लाव्हियाचे उत्पादन स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या महाराष्ट्रातील चाकण प्लांटमध्ये केले जाईल आणि कार 95 टक्के लोकलायजेशनसह येईल. स्लाव्हिया भारतीय बाजारपेठेला नजरेसमोर ठेवून विकसित करण्यात आल्याचे स्कोडाचे म्हणणे आहे.

स्कोडाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्लाव्हियावरुन पडदा हटवला होता. लॉन्च केल्यावर, ही कार Honda City, Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz आणि मिडसाईज सेडान सेगमेंटमधील इतर कारशी स्पर्धा करेल. स्कोडा स्लाव्हियाची किंमत 10 लाख रुपये ते 17 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे. Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल.

दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

Skoda Slavia चे फीचर्स

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

(Skoda starts production of Slavia Sedan in Chakan, Maharashtra, localized car will launch in March 2022)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.