Skoda सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करणार, Vitara Brezza – Hyundai Venue ला दोरदार टक्कर

स्कोडा ऑटो (Skoda Auto) कंपनी भारतीय ऑटो मार्केटमध्ये एक नवीन कार आणणार आहे, जी 4 मीटरची एसयूव्ही कार असू शकते. स्कोडा ऑटो बोर्डाचे अध्यक्ष थॉमस शेअर यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे.

Skoda सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करणार, Vitara Brezza - Hyundai Venue ला दोरदार टक्कर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 6:30 AM

मुंबई : स्कोडा ऑटो (Skoda Auto) कंपनी भारतीय ऑटो मार्केटमध्ये एक नवीन कार आणणार आहे, जी 4 मीटरची एसयूव्ही कार असू शकते. स्कोडा ऑटो बोर्डाचे अध्यक्ष थॉमस शेअर यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे. कंपनीने अद्याप लॉन्च टाइमलाइनचा उल्लेख केलेला नाही. मात्र एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे ही कार कंपनीचे ग्लोबल प्रोडक्ट असेल. (Skoda to launch subcompact SUV, will compete with Vitara Brezza – Hyundai Venue)

या आगामी स्कोडा कारबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु लॉन्च केल्यानंतर, ती सध्या अस्तित्वात असलेल्या Hyundai Venue, Kia Sonet, Maruti Vitara Brezza, Tata Nexon आणि Mahindra XUV300 सारख्या वाहनांना टक्कर देईल. अध्यक्षांनी सांगितले आहे की, ही कार आगामी काळात सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या कंपनीचे लक्ष 18 नोव्हेंबरला लॉन्च होणार्‍या स्कोडा स्लाव्हियावर (Skoda Slavia) आहे.

Skoda Slavia लाँचिंगसाठी सज्ज

इतकेच नाही तर कंपनी काही दिवसांनी म्हणजे 18 नोव्हेंबरला Skoda Slavia लाँच करणार आहे, जी कंपनीच्या Skoda Rapid ला रिप्लेस करेल. स्कोडाची ही नवीन कार अनेक चांगल्या फीचर्ससह सादर केली जाईल. कंपनीने अद्याप याबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही, परंतु अनेक लीक्समध्ये या कारचे फीचर्स समोर आले आहेत.

अपकमिंग Skoda Slavia चे फीचर्स

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

Skoda Slavia ची खासियत

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Skoda to launch subcompact SUV, will compete with Vitara Brezza – Hyundai Venue)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.