किआनंतर स्कोडा लाँच करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार… तब्बल 500 किमीपेक्षा जास्त रेंज

ऑटोकार नावाच्या एका वेबसाइटने आपल्या सोर्सच्या माध्यमातून याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार, ही इलेक्ट्रिक कार सध्या टेस्टिंग करण्यात येत आहे. या कारला पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.

किआनंतर स्कोडा लाँच करणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार... तब्बल 500 किमीपेक्षा जास्त रेंज
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:06 PM

किआनंतर आता स्कोडा कंपनीदेखील भारतात आपली पहिली ईव्ही लाँच करणार असल्याची माहिती आहे. या नवीन ईव्हीचे नाव एनयाक फोर्थ 80 एक्स (Skoda enyaq iv) असणार आहे. या कारचे नुकतेच रोड टेस्टिंगच्या दरम्यान फोटो समोर आले आहेत. ऑटोकार नावाच्या एका वेबसाइटने आपल्या सोर्सच्या माध्यमातून याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार, ही इलेक्ट्रिक कार (Electric car) सध्या टेस्टिंग (Testing) करण्यात येत आहे. या कारला पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या कारला कंपनी वीडब्ल्यू आईडी 4 प्लॅटफार्मसह सादर करणार असल्याची शक्यता आहे.

आतापर्यंतची सर्वाधिक रेंज

लिक झालेल्या माहितीनुसार, एनयाक फोर्थ 80 एक्स कारमध्ये टॉप एंड पॉवरट्रेन स्पेसिफिकेशन्स दिसून येतील. सोबत कारमध्ये 77kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. तिला 125 kWh डीसीचे फास्ट चार्जिंग मिळणार आहे. यात ड्युअल मोटर्स मिळणार आहेत. ही कार 265 एचपीची पॉवर जनरेट करणार आहे. ही कार केवळ 6.9 सेकंदांमध्ये 0-100 किमीचा स्पीड पकडेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सोबत ही कार सिंगल चार्जवर तब्बल 513 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देणार आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक लांब रेंज देणारी कार ठरेल असा विश्‍वास कंपनीकडून व्यक्त केला जात आहे. कंपनी या अपकमिंग कारला अनेक व्हेरिएंटमध्ये लाँच करण्याची अपेक्षा आहे.

काय आहेत अन्य फीचर्स

कारमध्ये 129 इंचाचा प्रोटेअस अलॉय व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. यात 13 इंचाचा फूल साइड टच स्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला असून तो टच स्क्रीनसह उपलब्ध होणार आहे. कारच्या आत एम्बीयंट लाइटिंग, एक लेदरने गुंडाळलेला स्टीअरिंग व्हील्स देखील मिळणार आहे. ही एक फूल लोडेड स्कोडा असणार असून यात एक लोअर स्पेसिफिेकेशन असलेले व्हर्जनदेखील येणार आहे. या शिवाय यात टू व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटदेखील उपलब्ध होणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्पेशल प्लॅटफार्मवर तयार करण्यात आलेल्या स्कोडाची अपकमिंग ईव्ही स्कोडा एनयाक फोर्थ एक क्रोसओव्हर बॉडी टाइपची कार असणार आहे. यात प्रामुख्याने इलेक्ट्रिक कारसाठी तयार करण्यात आलेले प्लेटफार्म एमईबीवर तयार करण्यात आल आहे. या प्लॅटफार्मवर फॉक्सवेगन आईडी 4 आणि आडी क्यू 4 ई ट्रोनलादेखील तयार करण्यात आले आहे. या प्लॅटफार्मच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचे झाल्यास हे सिंगल, रियर व्हील ड्राइव्ह आणि ड्युअल मोटर किंवा आल व्हील ड्राइव्हिंगसह उपलब्ध आहेत. अपकमिंग कार 4,648 एमएमपर्यंत लांब असू शकते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.