AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car safety : टायर बदलण्याचे काही खास इंडिकेटर, जाणून घ्या टायरसंदर्भातील कोही गोष्टी आणि रहा निश्चिंत

त्येक गोष्टीचं वय असतं असं म्हणतात. शिवाय प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेच. तशाच प्रकारे टायरला देखील मर्यदा आहे.

Car safety : टायर बदलण्याचे काही खास इंडिकेटर, जाणून घ्या टायरसंदर्भातील कोही गोष्टी आणि रहा निश्चिंत
टायर बदलण्याचे काही खास इंडिकेटर,Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 8:22 AM

मुंबई :  अनेकदा गाडीचे (Car) टायर (Tyre) कधी बदलावे हेच कळत नाही. अनेक लोक लांबच्या प्रवासाला जायचं असल्यास कारचे टायर आधी गॅरेजमध्ये (garage) दाखवून घेतात आणि त्यानंतरच प्रवासाला जातात. अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही की, गाडीचे टायर नेमके बदलायचे कधी. पावसाळ्यापूर्वी देखील गाडीचे टायर बदलण्याची अनेक ठिकाणी चर्चा असते. पावसाळ्यात गाडीच्या टायरकडे विशेष लक्ष दिलं जातं. यातच काही अशा खास गोष्टी आहेत. ज्या गोष्टींमुळे तुमच्या गाडीचे टायरही योग्यवेळी बदलले जातील आणि तुम्हीची सुरक्षित रहाल. बदलते हवामान, ड्रायव्हिंग पॅटर्न, रस्त्याची स्थिती यासारख्या गोष्टींचा तुमच्या टायर्सच्या टिकाऊपणावर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे योग्य वेळी टायर बदलणे तुमच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचं आहे. कारच्या काळजीसह टायरची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाच आहे. आम्ही तुम्हाला काही इंडिकेटर सांगणार आहोत. ते जाणून घेतल्यास गाडीचे टायर योग्यवेळी बदलले जाईल आणि तुम्ही देखील सुरक्षित रहाल.

…तर टायर बदलावा

तुमच्या कारचे टायर ट्रेड वेअर इंडिकेटरसह येतात. हे टायरची ट्रेड डेप्थ दाखवतात. तुम्ही ट्रेड वेअर इंडिकेटरसह तपासू शकतात. जर टायर ट्रेडची स्थिती खूप वाईट असेल किंवा योग्य मानकांची पूर्तता करत नसेल, तर तुम्ही टायर बदलून घ्यावा.

टायरची असमानता

कधीकधी, चुकीच्या अलाइनमेंटमुळे किंवा खराब सस्पेंशनमुळे टायरची स्थिती बिघडते. यामुळे टायरचे एक टोक बरोबर दिसत असले तरी दुसरे टोक खराब होते. असं झाल्यास अलाइनमेंट दुरुस्त करणं तसंच टायर बदलणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

क्रॅकच्या खुणा किंवा कडक होणं

टायरच्या रबरच्या कडकपणामुळे किंवा ट्रेडवर क्रॅकच्या खुणा असल्यामुळे टारमध्ये घट देखील होते. गाडी कमी चालवल्यामुळे अनेकदा असं घडतं. या प्रकाराच्या टायरमुळे तुम्ही कमी वेगानं प्रवास करू शकतात. पण जर हायवेवर गाडी चालवायची असल्यास किंवा तुम्हाला वेगावं गाडी चालवायची आवड असल्यास टायर बदलणं गरजेच आहे.

साइडवॉल नुकसान

रोडियल टायर बहुतेक वाहनांमध्ये वापले जातात. या प्रकारच्या टायरमध्ये साइडवॉल व्यवस्थित ठेवणं फार महत्वाचं आहे. मात्र, खराब रस्त्याची स्थिती आणि खड्डे टारच्या साइडवॉलला नुकसान पोहोचवून शकतात. तुम्हाला साइडवॉल पॅच देतात. पण चांगल्या सुरक्षिततेसाठी टायर बदलता येऊ शकतो.

टायरचं वय

प्रत्येक गोष्टीचे वय असतं असं म्हणतात. शिवाय प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहेच. तशाच प्रकारे टायरला देखील आहे. जसजसा वेळ जातो तसतसा टायर जड होतो. त्यामुळे टायरची लवचिकता आणि पकड प्रभावित होते. टायरचं आयुष्य तीन वर्ष किंवा 40 हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खेरदी करू नका.

दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.