Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Scooter | ओला-एथरच टेन्शन वाढणार, भारतातील जुनी प्रसिद्ध कंपनी घेऊन येतेय नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooter | ही टू-व्हीलर, कंपनीकडून 9 जानेवारीला सादर करण्यात येईल. अर्बन आणि प्रीमियम दोन्ही वेरिएंटमध्ये हे बदल दिसतील. सिंगल चार्जमध्ये या बॅटरीमुळे 113km ची रेंज मिळेल. या स्कूटरची बॅटरी फुल चार्ज करायला 4 तास 30 मिनिटांचा वेळ लागेल.

Electric Scooter | ओला-एथरच टेन्शन वाढणार, भारतातील जुनी प्रसिद्ध कंपनी घेऊन येतेय नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Electric Scooter
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 1:13 PM

Electric Scooter | सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ वेगाने वाढतेय. यात ओला आणि एथर या दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची मोठी पसंती मिळतेय. रस्त्यांवर ओला-एथर कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर धावताना दिसतात. आता लवकरच ओला-एथर कंपन्यांना इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. कारण भारतातील एक जुनी प्रसिद्ध कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये घेऊन येत आहे. बजाज ऑटो 2024 च्या सुरुवातीला अपडेट बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. ही टू-व्हीलर, कंपनीकडून 9 जानेवारीला सादर करण्यात येईल. चेतक EV च्या अपडेट वेरिएंटमध्ये कंपनी अनेक मोठे बदल करणार आहे.

2024 बजाज चेतक ईवीमध्ये सिग्निफिकेंट अपडेट मिळतील. अर्बन आणि प्रीमियम दोन्ही वेरिएंटमध्ये हे बदल दिसतील, बजाजच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.2kWh ची बॅटरी मिळेल. सिंगल चार्जमध्ये या बॅटरीमुळे 113km ची रेंज मिळेल. या स्कूटरची बॅटरी फुल चार्ज करायला 4 तास 30 मिनिटांचा वेळ लागेल.

2024 Bajaj Chetak EV चे फीचर्स

2024 बजाज चेतक ईवीमध्ये 73kmph चा टॉप स्पीड मिळेल. जुन्या मॉडलच्या तुलनेत हा स्पीड 10kmph जास्त असेल. सोबतच 2024 बजाज चेतकमध्ये नवीन TFT स्क्रीन मिळेल. त्याशिवाय या स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेविगेशन, टायर प्रेशन मॉनिटर सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिविटी, अंडर सीट 21 लीटरची स्टोरेज कॅपेसिटी असेल.

2024 Bajaj Chetak EV चे स्पेसिफिकेशन

बजाज ऑटोने या ई-स्कूटरमध्ये मेटल बॉडी दिली आहे. त्यामुळे 2024 Bajaj Chetak EV मध्ये बेस्ट बॉडी मिळेल. बजाज ऑटोने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला 2020 मध्ये पहिल्यांदा लॉन्च केलं होतं. तेव्हापासून कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सतत अपडेट करत आहे.

2024 Bajaj Chetak EV चा यांच्याशी होणार सामना

बजाज ऑटोच्या 2024 Bajaj Chetak EV इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये टीवीएस iQube, Ather 450x, Simple One, Ola S1 Pro सारख्या स्कूटरशी सामना असेल. 2024 Bajaj Chetak EV आणि या स्कूटर्सच्या प्राइसमध्ये फार अंतर नाहीय.

2024 Bajaj Chetak EV ची प्राइस

बजाज ऑटोची 2024 Bajaj Chetak EV स्कूटरची प्राइस 1.15 लाख रुपये आहे. याच्या फीचर लोडेड वेरिएंटची प्राइस 1.21 लाख रुपये आहे. बजाज आपल्या 2024 Bajaj Chetak EV इलेक्ट्रिक स्कूटरची डिलीवरी लवकरच सुरु करणार आहे.

राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.