सुझुकीची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, किंमत…

सुझुकी मोटरसायकल इंडिया (Suzuki Motorcycle India) 18 नोव्हेंबर रोजी नवीन स्कूटर सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आगामी स्कूटरचे अधिकृत नाव घोषित केले नसले तरी, बॅटरीवर चालणारी स्कूटर बजाज चेतकला टक्कर देईल, असे म्हटले जात आहे.

सुझुकीची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, किंमत...
Suzuki Electric Scooter
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 4:42 PM

मुंबई : सुझुकी मोटरसायकल इंडिया (Suzuki Motorcycle India) 18 नोव्हेंबर रोजी नवीन स्कूटर सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आगामी स्कूटरचे अधिकृत नाव घोषित केले नसले तरी, बॅटरीवर चालणारी स्कूटर बजाज चेतक आणि नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देईल, अशी अपेक्षा आहे. (Suzuki’s new electric scooter to launch on 18 november, know Price, range, features)

आगामी स्कूटर त्यांच्या प्रसिद्ध बर्गमन मॅक्सी-स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट असेल, असे म्हटले जात होते. परंतु हे शक्य नाही, कारण, हे व्हेरिएंट जपानी ऑटोमेकरच्या मॅक्सी-स्कूटरसारखे दिसत नाही. कंपनीने अद्याप या स्कूटरचे अधिकृत नाव जाहीर केले नसले तरी, त्यांच्या आगामी स्कूटरच्या काही खास फीचर्सची झलक शेअर केली आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या तपशीलांनुसार, ही स्कूटर स्पोर्टी स्टाइल असेल. हँडलबारमध्ये ब्लिंकर्स बसवले जातील तर समोरच्या ऍप्रनमध्ये मेन हेडलॅम्प असेंब्ली असेल.

यासह, डार्क कलर थीमवर आधारित निऑन येलोइश रंगाचे हायलाइट्स वापरून टू-व्हीलरचे अँग्युलर डिझाइन पूर्ण केले जाईल. तसेच, मोटो स्कूटरमध्ये संपूर्ण एलईडी लाइटिंगसह एक्सटीरियर डिझाईन केलेलं असेल, असं म्हटलं जात आहे.

सुझुकी स्कूटर डिजिटल डिस्प्लेसह सुसज्ज असेल

याशिवाय, टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे स्कूटर पूर्णपणे डिजिटल डिस्प्लेसह सुसज्ज असेल. डिस्प्ले स्मार्टफोनवर ब्लूटूथद्वारे जोडला जाऊ शकतो, जो टू-व्हीलरसाठी अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स अनलॉक करेल. बॅटरीवर चालणारी सुझुकी स्कूटर सिंगल चार्जवर किमान 100 किमी ते 150 किमीची रेंज देईल, अशी अपेक्षा आहे.

सुझुकीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती?

कंपनीने माहिती दिली आहे की उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी स्कूटरचे अधिकृत लॉन्चिंग केले जाईल. ही स्कूटर Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर आणि TVS iQube EV ला जोरदार टक्कर देईल. त्यामुळे ही स्कूटर 1 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीच्या रेंजमध्ये असेल, असे म्हटले जात आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Suzuki’s new electric scooter to launch on 18 november, know Price, range, features)

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.