Royal Enfield : फुकटची रपेट! रॉयल एनफिल्ड बुलेटवर मारा मोफत चक्कर
Royal Enfield : Royal Enfield Bullet वर रपेट मारायला कोणाला आवडणार नाही. बुलेटची सवारी म्हटलं की मन पाघळतंच नाही का? तर कंपनीने यापूर्वी शहराच्या आजुबाजूला बुलेटवर सफर करण्यासाठी खास योजना आणली होती. आता एक मोफत चक्कर मारण्याची पण खास योजना आहे. पण त्यासाठी बुलेट प्रेमींना हे काम करावे लागेल. त्यामुळे एक छदाम पण न देता चक्कर मारता येईल.
नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : Royal Enfield Bullet वर ऐटीत फिरावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला एकदा तरी बुलेटची सफर घडावी असे वाटत असते. पण बुलेट बजेटच्या दृष्टीने परवडत नाही. बजेट बाहेर असल्याने अनेक जण मन मारतात. पण अशा लोकांसाठी रॉयल एनफिल्डने खास योजना आणली आहे. त्यांना बुलेटवर शहराच्या आसपास एक रपेट (Long drive) मारता येईल. त्यासाठी काही रक्कम मोजावी लागणार आहे. ही योजना सध्या देशातील काही मोजक्या शहरात सुरु आहे. पण आता कंपनीने आणखी एक योजना सुरु केली आहे. त्यामुळे बुलेट प्रेमींना एक छदाम ही न देता या शाही सवारीवर रपेट मारता येईल. तुम्ही तयार आहात ना, बुलेटवर सफर करायला?
मोफत करा सफर
Royal Enfield Bullet वर मोफत सफर करण्यासाठी फार मोठं दिव्य करण्याची गरज नाही. अथवा फार मोठी प्रक्रिया पण करावी लागणार नाही. तुम्हाला तुमच्या जवळचा रॉयल एनफील्ड डीलर शोधावा लागेल. त्यानंतर तुमच्या आवडीची बाईक निवडावी लागेल. डीलरकडे टेस्ट ड्राईव्हसाठी विनंती करावी लागेल. डिलर तुम्हाला टेस्ट ड्राईव्हची सोय करुन देईल. त्यानंतर तुम्ही एक शाही रपेटचा आनंद घेऊ शकता.
ही गोष्ट ठेवा लक्षात
पण यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, टेस्ट्र डाईव्हसाठी तुमच्याकडे वाहन परवाना गरजेचा आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला ही जानदार शानदार रपेट मारता येणार नाही. सोबत तुम्ही तुमचे हेलमेट नेलं तर आणखी चांगलं, ते तुमच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे.
अशी बुक करा टेस्ट ड्राईव्ह
- तुम्ही कोणत्याही डीलरकडे जाऊन टेस्ट ड्राईव्हची मागणी करु शकता.
- पण त्यापूर्वी ऑनलाईन टेस्ट ड्राईव्ह बुक करणे फायदेशीर ठरेल. वेळेची बचत होईल.
- त्यासाठी गुगलवर Royal Enfield च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- याठिकाणी तुम्हाला Book Test Drive हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावे लागेल.
- टेस्ट ड्राईव्हसाठी तुम्हाला अनेक बुलेटचा पर्याय समोर येईल.
- मॉडेलची निवड केल्यानंतर वेळ आणि तारखी निश्चित करा.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमच्या आवडत्या बुलेटवर रपेट मारु शकता.