जानेवारीमध्ये TATA लॉन्च करणार दोन जबरदस्त कार्स, वाचा काय आहे वैशिष्ट्ये आणि किंमत ?

2021 या नव्या वर्षामध्ये टाटा मोटर्स से ग्रेविटास SUV, अल्ट्रोजचे मॉडल्स आणले आहेत. यामुळे कार प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

जानेवारीमध्ये TATA लॉन्च करणार दोन जबरदस्त कार्स, वाचा काय आहे वैशिष्ट्ये आणि किंमत ?
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 5:07 PM

नवी दिल्ली : ऑटो इंडस्ट्रीने फेस्टिव्ह सिझनमध्ये (Festive season) धमाकेदार कमाई केली आहे. यामुळे कोरोनाच्या संकटामध्ये झालेलं नुकसानही भरून निघालं आहे. अशात आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खरेदी-विक्री आणि ब्रॅडिंगसाठी स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे टाटा मोटर्सनेही (Tata motors) नव्या आकर्षक कार्स बाजारात आणल्या आहेत. 2021 या नव्या वर्षामध्ये टाटा मोटर्स से ग्रेविटास SUV, अल्ट्रोजचे मॉडल्स आणले आहेत. यामुळे कार प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (tata group will launch two tremendous cars tata altroz and tata gravitas in january)

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सकडून 13 जानेवारीला आकर्षक अशी अल्ट्रोज कार लॉन्च करणार आहेत. यावर्षी कंपनी Tata Altroz EV सुद्धा लॉन्च करणार आहे. इतकंच नाही तर टाटा मोटर्स सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये एचबीएक्स (HBX) सुद्धा बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. खरंतर, टाटाने 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही मायक्रो एसयूव्ही सादर केली होती. ही कार Mahindra KUV100 NXT आणि Maruti Suzuki Ignis यांना जोरदार स्पर्धा देणार असल्याचं बोललं जात आहे. या कारमध्ये टाटा मोटर्सकडून कोणती खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत जाणून घेऊयात…

टाटा ग्रॅविटास (Tata Gravitas)

एसयूव्ही (SUV) कार आवडणाऱ्या कार प्रेमींना टाटाची नवीन ग्रॅविटास नक्की आवडेल. ही एसयूव्ही टाटा मोटर्सच्या 7 सीटर हॅरियरचं अपकमिंग व्हर्जन आहे. नवीन एसयूव्ही ग्रॅविटास 2.0 Kryotec इंजिनसह देण्यात येणार आहे. इतंकच नाही तर 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 6 स्पीड AT यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये चाकांचा आकारही मोठा देण्यात आला आहे. या एसयूव्हीची किंमत 18 लाख ते 24 लाखांदरम्यान असू शकते. ही कार हॅरियरच्या ओमेगा प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे.

टाटा अल्ट्रोज टर्बो (Tata Altroz Turbo)

टाटा मोटर्सची प्रीमियम हॅच-बॅक कार अल्ट्रोज टर्बो पेट्रोल व्हेरिएंटमध्ये देण्यात आली आहे. 2021 मध्ये कंपनी अल्ट्रोज टर्बो पेट्रोल व्हेरिएंट लॉन्च करू शकते. भारतात या कारची चाचणी करण्याआधीच स्पॉट करण्यात आली आहे. या कारची किंमत सुमारे 8 लाख रुपये असू शकते.

टाटा अल्ट्रोज ईव्ही (Tata Altroz EV)

टाटा मोटर्स अल्ट्राझ हॅचबॅकचा खास इलेक्ट्रिक अवतार बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 30 किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. तर ही कार फूल चार्च केल्यानंतर 350 किमी अंतर कापू शकते. या कारची किंमत सुमारे 10 लाख असू शकते. (tata group will launch two tremendous cars tata altroz and tata gravitas in january)

संबंधित बातम्या :

Christmas Discounts विसरा! ‘ही’ कार कंपनी देतेय तब्बल 7 लाखांचा बंपर डिस्काऊंट

नवीन कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी लक्षात घ्या अन्यथा होऊ शकते नुकसान…

टाटा मोटर्सनेही गाड्यांच्या किंमती वाढवल्या, 1 जानेवारीपासून नव्या किंमती लागू

(tata group will launch two tremendous cars tata altroz and tata gravitas in january)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.