Kaziranga Edition सह नेक्सॉन, हॅरियर, सफारी आणि पंच लाँच होणार, टीझर जारी

टाटा मोटर्सने (Tata Motors) या आठवड्याच्या सुरुवातीला, आयपीएल 2022 (IPL 2022) साठी नवीन टाटा पंच (Tata Punch) काझीरंगा एडिशन (Kaziranga Edition) कार सादर केली आहे. टाटा समूह आता इंडियन प्रीमियर लीग 2022 आणि 2023 च्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे.

Kaziranga Edition सह नेक्सॉन, हॅरियर, सफारी आणि पंच लाँच होणार, टीझर जारी
Tata Punch Kaziranga SUV Image Credit source: Tata Motors
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 4:54 PM

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) या आठवड्याच्या सुरुवातीला, आयपीएल 2022 (IPL 2022) साठी नवीन टाटा पंच (Tata Punch) काझीरंगा एडिशन (Kaziranga Edition) कार सादर केली आहे. टाटा समूह आता इंडियन प्रीमियर लीग 2022 आणि 2023 च्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे. यामुळे, कंपनीने पंच काझीरंगा एडिशन कार सादर केली आहे, या कारचा आयपीएल 2022 स्पर्धेदरम्यान, लिलाव केला जाईल. या लिलावातून मिळणारा पैसा आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या (Kaziranga National Park) संरक्षणासाठी खर्च केला जाणार आहे. कंपनीने काझीरंगा एडिशन – नेक्सॉन, हॅरियर, सफारी, पंच नाऊ साठी एक नवीन टीझर जारी केला आहे. हा टीझर सूचित करतो की नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीसाठी अशा आणखी काझीरंगा एडीशन्सचे नियोजन केले जात आहे.

या प्रत्येक SUV चे हेडलॅम्प समोरच्या रस्त्यावर गेंड्याची प्रतिमा प्रतिबिंबित करतात. सध्या आसामच्या जंगलात 3,000 गेंडे आहेत, त्यापैकी 2,000 एकट्या काझीरंगा येथे आढळतात. हे एक शिंग असलेले गेंडे आहेत आणि त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. या विशेष टाटा काझीरंगाच्या एडिशन्सचा लिलाव हे संरक्षण सुरू ठेवण्यासाठी कामी येईल.

टॉप व्हेरिएंट

टाटा मोटर्सने या आठवड्याच्या सुरुवातीला पंच काझीरंगा एडिशन कार जारी केली. टाटा पंच काझीरंगा एसयूव्हीची नोंदणी कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आली आहे. ही कार Meteor Bronze पेंट स्कीमसह येते. ही कार सध्या खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या नियमित मॉडेलपेक्षा वेगळे आहे. हे व्हेरिएंट पंचच्या क्रिएटिव्ह वेरिएंटच्या टॉप लाईनअपवर बेस्ड आहे आणि ‘काझीरंगा’ स्कफ प्लेट्ससह या कारची मागची विंडशील्ड राइनो साइनला सपोर्ट करते.

कारचे फीचर्स

या कारच्या आतील भागात, ग्लोव्ह बॉक्सवर गेंड्याचे चित्र आहे. या बदलांव्यतिरिक्त, बाकी टाटा पंचमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यात प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल आहेत. यात रूफ रेल, रेन सेन्सिंग वायपर, 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉबसह इंटीरियरसह नियमित मॉडेल सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत. अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इंजिन सुरू करण्यासाठी/बंद करण्यासाठी पुश बटण, ड्रायव्हर सीटची उंची अॅडजस्ट करणे, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यांचा समावेश करण्यात आला आहे.

कशी आहे नवी टाटा पंच?

नवीन टाटा पंच ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर बनवलेली पहिली SUV असेल आणि भारतातील Nexon subcompact SUV च्या खाली असेल. पंचमध्ये कंपनीच्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. ही कार आक्रमक स्टायलिंग लूकसह येते. टाटा मोटर्सने आधीच निळ्या आणि ड्युअल-टोन रंगाचे पर्याय जाहीर केले आहेत आणि सिंगल टोन रंगांसह आणखी दोन-टोन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. “सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.

टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की, पंच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या अपोझिट जॅक-अप हॅचबॅकपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल आणि या एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स असतील. कंपनीने सूचित केले आहे की, या कारमध्ये काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील जसे की, ट्रॅक्शन मोड (सँड, रॉक, मड), हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट, तसेच एसयूव्ही क्रेडेन्शियलसारखे काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील. ही कार पुढच्या बाजूला 185 मिमीच्या हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल.

आकर्षक डिझाईन

टाटाच्या सिग्नेचर स्प्लिट लायटिंग डिझाइनसह या कारचा फ्रंट एंड आक्रमक आहे. टाटा लोगोमधील काळ्या पॅनेलमध्ये ट्राय-अॅरो पॅटर्न देखील आहे, ज्याभोवती एलईडी डे-टाइम रनिंग लँप आहे. तर मुख्य हेडलॅम्प युनिट्स खाली स्थित आहेत, जे प्रोजेक्टर लाइटसह येतील. समोरचा बहुतेक भाग जड कव्हरने झाकलेला आहे आणि त्याला एक मोठा ट्राय-अॅरो डिझाईन ग्रिल आणि मोठे गोल फॉग लॅम्प मिळतात.

दमदार इंजिन

नवीन पंच 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह येईल, जे Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकला पॉवर देतं. पेट्रोल मिल 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आणि पर्यायी AMT युनिटसह येण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टाटा पंच मारुती सुझुकी एस-प्रेसो आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करेल. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

अँड्रॉयड, ॲपल कारप्ले कनेक्टीव्हिटी, मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट स्क्रीनसह MG ZS EV 2022 लाँचिंगसाठी सज्ज

सिंगल चार्जमध्ये मुंबई ते गोवा प्रवास, Hyundai ची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल

4.5 लाखांची Maruti कार 2.7 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.