टाटा मोटर्सची नवीन सफारी लॉन्च, जाणून घ्या गाडीची काय आहेत हटके फिचर्स?

टाटा मोटर्सची नवीन सफारी लॉन्च, जाणून घ्या गाडीची काय आहेत हटके फिचर्स? (tata Motors launches new Safari, know about the unique features of the car)

टाटा मोटर्सची नवीन सफारी लॉन्च, जाणून घ्या गाडीची काय आहेत हटके फिचर्स?
टाटा मोटर्सची नवीन सफारी लॉन्च
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:53 PM

नवी दिल्ली : टाटाची नवीन सफारी लॉन्च झाली आहे. कंपनीने या आलिशान कारची डिलीव्हरीसुद्धा सुरू केली आहे. टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी सफारीसोबत एक्सेसरी पॅकेजही देत आहे. एक्सेसरीमध्ये आपल्याला फोर इन ऑल ऑप्शन मिळणार आहे. याच्या किंमतीबाबत मात्र कंपनीकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बेस एक्सेसरीज पॅकेजची किंमत 40 हजार रुपये आहे. चार पॅकेजची नावे Accomplished, Accomplished Pro, Adventure आणि Adventure Pro अशी आहेत. (tata Motors launches new Safari, know about the unique features of the car)

तुमची आवडती एक्सेसरीज घेऊ शकता

जर आपल्याला काही आरामदायी एक्सेसरीज हव्या असतील, तर आपण Accomplished आणि Pro व्हर्जनची निवड करू शकता. तसेच जर आपल्याला चारपैकी कुठलेही पॅकेज नको असेल तर आपण टाटा मोटर्सच्या शोरुममध्ये जाऊन तुम्हाला आवडणारी एक्सेसरीज लावू शकता. Accomplished पॅकेजमध्ये आपल्याला डमी एग्जॉस्ट क्रोम, मडफ्लॅप्स, टेलगेट क्रोम, रियर बंपर क्रोम, बोनट मास्कॉट, स्कफ प्लेट्स, पडल लॅम्प्स, एयर प्युरीफायर, कार्पेट्स, फ्लोर मॅट मिळणार आहे. तसेच प्रो व्हर्जनमध्ये अंडरबॉडी लायटिंग, वायरलेस चार्जर, फ्रंट पार्किंग सेंसर्स, साइट स्टेप्स आणि रियर सीट एंटरटेनमेंट मिळू शकणार आहे.

काय आहेत अॅडव्हेंचर पॅकेज?

अ‍ॅडव्हेंचर पॅकेजबाबत बोलायचे झाल्यास यात बोनेट स्कूप, फ्रंट पार्किंग सेंसर्स, साइड स्टेप्स, डॅशकॅम, बॅकसीट ऑर्गनायजर, 3डी मोल्डेड मॅट्स आणि स्क्प प्लेट्स यांचा समावेश असेल. टाटा मोटर्स नव्या सफारीमध्ये सायकल कॅरिअर, लगेज बॅग्स, जेरी कॅन्स, व्हील कॅप्स आणि रूफ रॅकसुद्धा देणार आहे. हे रॅक 75 किलोपर्यंतचे वजन उचलू शकणार आहे.

परफॉर्मंन्स अपग्रेड नाही

या पॅकेजशिवाय ग्राहक अन्य एक्सेसरीज घेऊ शकणार आहेत. हे सर्वकाही ala carte च्या मदतीने होऊ शकेल. टाटा सफारीमध्ये कुठलेही परफॉर्मंन्स अपग्रेड नाही. सफारीमध्ये 2.0 लीटरचे डिझेल इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 170एचपी/ 350एनएमला टॉर्क देते. नवीन सफारी गाडी 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ऑप्शनसह येते.

किती असेल गाडीची किंमत?

टाटा मोटर्सने सफारीच्या किंमती खूप आक्रमक ठेवल्या आहेत. टाटा सफारीचा बेस व्हेरिएंट हॅरियरपेक्षा नवीन गाडीची 69,500 रुपये अधिक आहे. टाटा सफारी आणि टाटा हॅरियरच्या एक्सझेड व्हर्जनच्या तुलनेत किंमतीत 1.34 लाख रुपयांचा फरक आहे. मात्र, सफारी आणि हॅरियरचे टार्गेट ग्राहक वेगवेगळे आहेत. दुसरीकडे, जर आपल्याला 1.34 लाख रुपये देऊन अधिक जागा आणि अधिक वैशिष्ट्ये मिळत असेल तर सफारी खरेदी करण्यात काहीच हरकत नाही. (tata Motors launches new Safari, know about the unique features of the car)

इतर बातम्या

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत संस्कृती बालगुडेचा फोटो, चर्चा तर होणारच!

आनंदाची बातमी: ऐन लग्नसराईच्या मोसमात जळगावात सोने-चांदी स्वस्त

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.