Harrier, Nexon सह Tata च्या गाड्यांवर 65000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
Tata च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार Tiago, Tigor, Nexon आणि Harrier सारख्या निवडक गाड्यांवर कंपनीकडून 65,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे.
1 / 5
Tata Motors ने जून 2021 साठी काही निवडक गाड्यांवर आकर्षक डिस्काऊंटची घोषणा केली आहे. Tata च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार Tiago, Tigor, Nexon आणि Harrier सारख्या निवडक गाड्यांवर कंपनीकडून 65,000 रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे.
2 / 5
टाटा टियागो ही कार 15,000 रुपयांच्या रोख सवलतीत आणि 10,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांसाठी 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलतदेखील देण्यात येत आहे.
3 / 5
Tigor बद्दल बोलायचे झाल्यास या कारवर 15,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत उपलब्ध आहे.
4 / 5
Nexon कारवर रोख सवलत उपलब्ध नाही, मात्र या कारच्या डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Nexon पेट्रोल कारवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे, तर डिझेल ग्रेडवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. Nexon EV च्या XZ Plus LUX ट्रिमवर 15,000 रुपये तर XZ Plus ट्रिमवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.
5 / 5
टाटा हॅरियरच्या 'XZ+', 'XZA+' ट्रिम्स आणि डार्क, कॅमो एडिशन मॉडेल वगळता इतर सर्व व्हेरिएंट्सवर 25,000 रुपयांची रोख सूट मिळत आहे. निवडक व्हेरिएंट्ससह खरेदीदार 40,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह एसयूव्हीवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळवू शकतात.