टाटा मोटर्स बनवणार 15 हायड्रोजन आधारीत इंधन सेल बस, आयओसीएलचे आदेश

आयओसीएल(IOCL)च्या संशोधन व विकास केंद्राला बस पुरविण्याशिवाय टाटा मोटर्स त्यांच्याशी संशोधन व विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल आणि व्यावसायिक वाहनांसाठी इंधन सेल तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा अभ्यास करेल. (Tata Motors to build 15 hydrogen-based fuel cell buses, IOCL orders)

टाटा मोटर्स बनवणार 15 हायड्रोजन आधारीत इंधन सेल बस, आयओसीएलचे आदेश
टाटा मोटर्स बनवणार 15 हायड्रोजन आधारीत इंधन सेल बस
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 7:17 PM

नवी दिल्ली : देशातील सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड(IOCL)कडून 15 हायड्रोजन-आधारीत इंधन सेल बसेससाठी निविदा घेतल्याची माहिती दिली आहे. आयओसीएलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हायड्रोजन इंधन सेल बसच्या पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या होत्या, त्यामध्ये टाटा मोटर्सची निवड झाली. या सर्व 15 बसेसची डिलिव्हरी सामंजस्य करार (एमओयू) वर सही झाल्यापासून 144 आठवड्यांच्या आत होईल. (Tata Motors to build 15 hydrogen-based fuel cell buses, IOCL orders)

आयओसीएल(IOCL)च्या संशोधन व विकास केंद्राला बस पुरविण्याशिवाय टाटा मोटर्स त्यांच्याशी संशोधन व विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल आणि व्यावसायिक वाहनांसाठी इंधन सेल तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा अभ्यास करेल. यासाठी दोन्ही घटक दिल्ली-एनसीआरमधील रियल-वर्ल्ड कंडीशनमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी या बसेसची चाचणी, देखभाल व संचालन करतील. या बसेसचे आयओसीएल(IOCL)द्वारे तयार आणि वितरीत केली जाणारी हायड्रोजनद्वारे इंधन भरले जाईल.

अनेक प्रमुख कार्यक्रमांसाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण

इंडियन ऑईलचे चेअरमन एस. एम. वैद्य म्हणाले की, हायड्रोजन अर्थव्यवस्थेमध्ये वाहतुकीसह विविध अॅप्लीकेशनसाठी पुढे जाण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये इंडियन ऑईल आघाडीवर आहे. देशातील हा पहिला प्रकल्प देशातील सर्वात मोठा इंधन पुरवठादार आणि सर्वात मोठा व्यावसायिक वाहन निर्माता हायड्रोजन आणि इंधन सेल तंत्रज्ञानाला पुढील स्तरावर नेईल. देशातील विविध नामांकित मार्गांवर आणि महत्त्वाच्या भागात हायड्रोजन-आधारीत वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव असलेल्या इंडियन ऑयलच्या इतर अनेक प्रमुख कार्यक्रमांसाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हायड्रोजनला नेट झिरो इंधन बनविण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करीत आहे.

काय म्हणाले गिरीश वाघ?

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेइकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष गिरीश वाघ म्हणाले, आयओसीएलकडून ही प्रतिष्ठित निविदा जिंकल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे, कारण टाटा मोटर्सने स्वच्छ आणि हरित सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्यातील रेडीमेड तंत्रज्ञान ऑफर करण्याचा टाटा मोटर्समध्ये समृद्ध वारसा आहे. आम्ही फेम(FAME) 1 अंतर्गत 215 ईव्ही बस यशस्वीरित्या पुरवल्या आहेत आणि फेम 2 अंतर्गत 600 ईव्ही बसेसच्या ऑर्डर दिल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारख्या सन्मानित कंपनीकडून पीईएम इंधन सेल बसेस पुरवण्याच्या या आदेशामुळे भारतातील वाहतुकीचे भविष्य बदलण्यासाठी भारतावर लक्ष केंद्रित करणारे पर्यायी शाश्वत इंधन विकसित करण्याच्या आपल्या चालू प्रयत्नांना प्रोत्साहन मिळते.

काय म्हणाले एसएसव्ही रामकुमार?

इंडियन ऑईलचे संचालक (आर अँड डी) डॉ एसएसव्ही रामकुमार म्हणाले की, इंडियन ऑईल अत्याधुनिक आर अँड डी माध्यमातून भारतात हायड्रोजन ऊर्जेची निर्मिती आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही इंधन सेल संशोधनासाठी टाटा मोटर्ससह मिळून कार्य करत आहोत आणि 4 नाविन्यपूर्ण पद्धतींवर आधारीत दररोज सुमारे 1 टन हायड्रोजन तयार करण्यासाठी पायलट प्लांट्सची स्थापना केली आहे. (Tata Motors to build 15 hydrogen-based fuel cell buses, IOCL orders)

इतर बातम्या

चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात? मग, ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

लोकसभा आणि राज्यसभेच्या किती खासदारांनी कोरोना लस घेतली? एकही डोस न घेतलेले किती खासदार?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.