टाटा मोटर्स Tiago आणि Tigor चं CNG व्हेरिएंट सादर करण्यास सज्ज, जाणून घ्या किंमती आणि अपडेट्स
Tata Motors कंपनी Tiago हॅचबॅक आणि Tigor कॉम्पॅक्ट सेडानच्या सीएनजी व्हर्जनवर काम करत आहे. दोन्ही वाहने भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहेत.
मुंबई : Tata Motors कंपनी Tiago हॅचबॅक आणि Tigor कॉम्पॅक्ट सेडानच्या सीएनजी व्हर्जनवर काम करत आहे. दोन्ही वाहने भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहेत. ऑटोकार इंडियाच्या डीलरशीप सूत्रांनुसार, दोन्ही वाहने पुढील महिन्यात भारतीय बाजारात दाखल होतील. काही डीलरशिपने Tigor सीएनजी आणि Tiago सीएनजीसाठी अनधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. (Tata Motors to launch Tiago CNG and Tigor CNG next month)
कारमेकर कंपनी येत्या काही आठवड्यांमध्ये अनफॉर्मल बुकिंग सुरू करू शकते. परंतु अद्याप Tiago आणि Tigor च्या CNG व्हेरिएंटबाबत Tata Motors कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील आणि मागील बाजूस असलेले काही CNG बॅज वगळता दोन्ही वाहनांमध्ये कोणतेही कॉस्मेटिक बदल होणार नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आता अनेक लोक सीएनजी सुसज्ज वाहनांचा पर्याय निवडत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांची किंमत आणखी जास्त असेल आणि मूलभूत चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव असताना, पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे लोकांचा अजूनही सीएनजी वाहनांकडे कल आहे. देशभरात बरीच सीएनजी स्टेशन्स आहेत आणि तुमच्याकडे सीएनजीची कमतरता असली तरीही तुम्ही सहज उपलब्ध असलेल्या पेट्रोलवर गाडी चालवू शकता.
मेकॅनिकली दोन्ही गोड्या सारख्याच असणार
दोन्ही मॉडेल्स 1.2-लीटर, थ्री-सिलेंडर, ऑटोमॅटिकली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह ऑफर केले जातील जे जास्तीत जास्त 86 PS पॉवर आणि 114 Nm पीक टॉर्क देतात, परंतु CNG द्वारे पॉवर आणि टॉर्क आउटपुट कमी केले जाईल. पेट्रोल इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच 5 स्पीड AMT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मात्र CNG व्हेरिएंट फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑफर केलं जाईल.
दोन व्हेरिएंट्समध्ये सादर होणार सीएनजी कार
टाटा मोटर्स सीएनजी व्हेरिएंट दोन व्हर्जन्समध्ये ऑफर करेल. Tiago CNG XE आणि XT व्हेरिएंटमध्ये सादर केली जाईल तर Tigor XE आणि XM व्हेरिएंटमध्ये सादर केली जाऊ शकते. टाटा टियागो पाच व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते ज्यामध्ये XE, XT(O), XT, XZ आणि XZ+ हे पर्याय आहेत. दुसरीकडे, टिगॉर 6 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. XE, XM, XZ, XZ+, XMA आणि XZA+ आहेत.
टियागोपेक्षा टिगॉर अधिक व्यावहारिक
Tigor ची बूट स्पेस Tiago पेक्षा खूपच जास्त आहे कारण ती सेडान आहे. टियागोची बूट स्पेस 242 लीटर आहे तर टिगॉरची बूट स्पेस 419 लीटर आहे. टियागोमधील बूट स्पेस सीएनजी सिलिंडर घेतील तर टिगॉरच्या बूटमध्ये सीएनजी सिलिंडर बसल्यानंतरही जागा असेल. त्यामुळे, टियागो सीएनजीच्या तुलनेत Tigor CNG अधिक व्यावहारिक असेल.
Tiago CNG आगामी मारुती सुझुकी Celerio CNG, WagonR CNG, Hyundai Grand i10 Nios CNG आणि आगामी मारुती सुझुकी स्विफ्ट CNG ला टक्कर देईल. तर Tigor CNG चा मुकाबला Hyundai Aura CNG आणि अपकमिंग Maruti Suzuki Dzire CNG शी होणार आहे.
CNG व्हेरिएंटच्या किंमती
Tiago ची किंमत 4.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते आणि 7.07 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. तर टिगॉरची किंमत 5.67 लाख ते 7.84 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. सीएनजी व्हेरियंटची किंमत नियमित व्हेरियंटपेक्षा 60,000 रुपयांनी अधिक असण्याची अपेक्षा आहे.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 1000 किमी रेंज, Tesla ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक सेडान सज्ज
5 लाखांहून कमी किंमतीत घरी आणा सेकेंड हँड SUV, Mahindra Thar सह अनेक पर्याय उपलब्ध
(Tata Motors to launch Tiago CNG and Tigor CNG next month)