Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल झालेली Swift टाटा मोटर्सकडून ट्रोल, पाहा VIDEO

लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (NCAP) अलीकडेच या प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्ट या कारची क्रॅश-टेस्ट केली. सुरक्षा वॉचडॉगकडून या कारला शून्य-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे.

NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल झालेली Swift टाटा मोटर्सकडून ट्रोल, पाहा VIDEO
Swift in Latin Ncap Crash Test
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 3:40 PM

मुंबई : लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (NCAP) अलीकडेच या प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्ट या कारची क्रॅश-टेस्ट केली. सुरक्षा वॉचडॉगकडून या कारला शून्य-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार मारुती सुझुकी मोटर गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनवण्यात आली आहे, म्हणजेच ती मेड इन इंडिया कार आहे. कारला अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनच्या बाबतीत 15.53 टक्के रेटिंग मिळालं आहे, तर लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या कारला 0 टक्के रेटिंग मिळालं आहे. (Tata Motors trolls Maruti on social media after Suzuki Swift scores zero star in Latin NCAP crash test)

पादचारी सुरक्षा आणि असुरक्षित ट्रॅक वापरकर्त्यांसाठी कारने 66 टक्के स्कोर केला आहे. तरीही सुरक्षा सहाय्य प्रणालीच्या (सिक्योरिटी असिस्टन्स सिस्टम) संदर्भात रेटिंग पुन्हा 7 टक्क्यांवर घसरले. त्यांच्या अहवालात, लॅटिन एनसीएपीने म्हटलं आहे की, खराब साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन आणि चाचणी दरम्यान खुला दरवाजा यामुळे कारला 0 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. स्टँडर्ड साइड हेड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, स्टँडर्ड ESC ची कमतरता आणि चाचणीसाठी CRS ची शिफारस न करण्याचा सुझुकीचा निर्णय यामुळे कारचा व्हिप्लॅश स्कोअर देखील कमी होता.

लॅटिन NCAP ने असेही म्हटले आहे की, कारचा दरवाजा उघडल्याने UN95 नियमन आवश्यकता पूर्ण होणार नाही. वॉचडॉगने अहवाल दिला की, युरोपमध्ये स्विफ्ट 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसह (ईएससी) स्टँडर्ड म्हणून विकली जाते, तर लॅटिन अमेरिकेतील मॉडेल साइड बॉडी आणि हेड एअरबॅग आणि ईएससी स्टँडर्डसह दिले जात नाही.

टाटा मोटर्सकडून स्विफ्ट ट्रोल

दरम्यान, NCAP क्रॅश टेस्टमध्ये नापास झालेल्या स्विफ्ट कारला टाटा मोटर्सने ट्रोल केलं आहे. टाटा मोटर्स कंपनीला नेहमीच त्यांच्या मजबूत वाहनांसाठी लोकांनी पसंती दर्शवली आहे. अशा परिस्थितीत कंपनीने पुन्हा एकदा विरोधी कंपनीवर सुरक्षेच्या प्रश्नावरुन हल्लाबोल केला आहे, होय यावेळी मारुतीची स्विफ्ट कार यादीत समाविष्ट आहे.

मारुतीच्या स्विफ्ट कारला अलीकडेच लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये 0 स्टार रेटिंग मिळालं आहे. टाटा मोटर्सने मारुतीला सोशल मीडियावर हायलाइट करून ट्रोल केलं आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या कंपनीत तयार होणारी वाहने अजूनही भारतीय रस्त्यांवर सर्वात सुरक्षित आहेत.

टाटा मोटर्सने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे की, लेटेस्ट NCAP टेस्ट स्पष्टपणे दर्शवते की स्विफ्ट गाडी चालवणे सुरक्षित नाही. कंपनीने थेट स्विफ्टला लक्ष्य केले, जी मारुतीची प्रीमियम हॅचबॅक कार आहे. त्याचबरोबर या वाहनाच्या विक्रीचे आकडेही खूप चांगले आहेत.

कस्टमर्स कोबेसिक सेफ्टी फीचर गरजेचं

लॅटिन एनसीएपीचे जनरल सेक्रेटरी अलेजांद्रो फ्युरेस म्हणाले, मूलभूत वाहन सुरक्षा, जी मेच्यॉर अर्थव्यवस्थेच्या बाजारपेठांमध्ये स्टँडर्ड आहे. लॅटिन अमेरिकन ग्राहकांनी त्यांच्यासाठी अतिरिक्त पैसे न देता दावा केला पाहिजे. ही सुरक्षा वैशिष्ट्ये रस्ते अपघातांमध्ये एखाद्या लसीप्रमाणे काम करतात. ग्राहकांना यासाठी अधिक पैसे न देता पुरवठा करण्यात येत असलेली लस मिळवण्याचा अधिकार आहे.

Global NCAP रेटिंगमध्ये केवळ 2 स्टार

ग्लोबल एसीएपी (Global NCAP) रेटिंगमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या कारला केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार जास्त वजन उचलण्यात सक्षम नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम) 5.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये बीएस-6 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्सच्या पर्यायासह सादर करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज, eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Tata Motors trolls Maruti on social media after Suzuki Swift scores zero star in Latin NCAP crash test)

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.