सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक कारची भारतात रेकॉर्डब्रेक विक्री

TATA Nexon EV एप्रिल 2021 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 525 युनिट्सची विक्री केली आहे.

सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज, 'या' इलेक्ट्रिक कारची भारतात रेकॉर्डब्रेक विक्री
TATA Nexon EV
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 5:17 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (TATA Nexon EV breaks record and sold 525 units in april 2021)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, टाटा कंपनीची एक इलेक्ट्रिक कार अशी आहे, जिला गेल्या काही वर्षांपासून भारतात मोठी मागणी आहे. सध्या तरी टाटाची ही इलेक्ट्रिक कार भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये वर्चस्व गाजवतेय. TATA Nexon EV असं या कारचं नाव आहे. या कारला भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. एप्रिल 2021 मध्ये या कारने विक्रीच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड स्थापित केले आहेत.

एप्रिलमध्ये 525 युनिट्सची विक्री

TATA Nexon EV एप्रिल 2021 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण 525 युनिट्सची विक्री केली आहे. देशभरातील इलेक्ट्रिक सेगमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, देशात 749 युनिट्सची विक्री झाली आहे. यामध्ये टाटाच्या नेक्सॉनचं वर्चस्व दिसून येत आहे. दुसरीकडे कंपनीच्या एकूण सेलबाबत बोलायचे झाल्यास टाटाच्या एकूण सेलपैकी 7.5 टक्के योगदान नेक्सॉनचं आहे.

MG ZS EV दुसऱ्या क्रमांकावर

इलेक्ट्रिक विभागात दुसरं स्थान MG ZS EV या कारने पटकावलं आहे. कंपनीने गेल्या महिन्यात देशात 156 युनिट्सची विक्री केली आहे. Tata Tigor EV आणि Hyundai Kona EV या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. Tigor EV च्या इकूण 56 युनिट्सची विक्री झाली आहे तर Hyundai Kona EV च्या 12 युनिट्सची विक्री झाली आहे.

कशी आहे टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही?

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात

(TATA Nexon EV breaks record and sold 525 units in april 2021)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.