कोण आहे बाहुबली, टाटा की मारुती, ठरवेल क्रॅश टेस्ट

Crash Test | Bharat NCAP ही 1 ऑक्टोबर 2023 रोजी लागू करण्यात आली आहे. या कार्यक्रमातंर्गत आयात होणाऱ्या कारची क्रॅश टेस्ट करण्यात येणार आहे. कार किती मजबूत आहे, त्यावर या चारचाकीला 0 ते 5 या दरम्यान त्यांना सेफ्टी रेटिंग देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात अगोदर आता कोणत्या कारची टेस्टिंग करण्यात येईल, ते लवकरच समोर येईल.

कोण आहे बाहुबली, टाटा की मारुती, ठरवेल क्रॅश टेस्ट
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 5:02 PM

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : भारत न्यू कार असिस्मेंट प्रोग्राम (Bharat NCAP) 22 ऑगस्ट रोजी लागू करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची देशात सुरुवात केली. भारताचा स्वतःचा क्रॅश टेस्ट सेफ्टी प्रोगाम आहे. त्यात आता वाहनांची तपासणी आणि मजबूती समोर येईल. आता भारतात तयार होणाऱ्या कारची चाचणी देशात होणार आहे. आता त्यासाठी परदेशाची मदत घेण्याची गरज उरली नाही. हा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2023 रोजीपासून लागू करण्यात आला आहे. पहिल्या बॅचची तयारी पण झाली आहे. त्यामुळे कारची मजबूती आता देशातच तपासल्या जाणार आहे. तर कारला 0 ते 5 या दरम्यान सेफ्टी रेटिंग पण देण्यात येईल.

या दिवसांपासून चाचणी

मीडिया रिपोर्ट्नुसार, पहिल्या बॅचमधील वाहनांची क्रॅश टेस्ट 15 डिसेंबर रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळामुळे आणि दिवाळी आल्याने क्रॅश टेस्टला उशीर झाला आहे. त्यामुळे हा कालावधी पुढे ढकलला आहे. पहिल्या बॅचमधील काही वाहनांना नॉमिनेट पण करण्यात आले आहे. या परीक्षणानंतर अशा वाहनांवर एक विशेष स्टीकर लावण्यात येईल. त्यांच्या कामगिरीनुसार, स्टार रेटिंग देण्यात येईल. पॉईंट्स देण्यात येतील.

हे सुद्धा वाचा

काय होईल फायदा

वाहन निर्मात्या कंपन्या त्यांच्या वाहनांना क्रॅश टेस्टनुसार सेफ्टी रेटिंग देतील. त्यामुळे कार खरेदीदारांना वाहन खरेदी करताना सुरक्षेबाबत माहिती मिळेल. त्यासाठी नवीन लोगो आणि स्टीकर पण जाहीर करण्यात आले आहे. नवीन भारतीय कारवर हे स्टीकर दिसतील. 3.5 टन पेक्षा कमी वजनाच्या M1 श्रेणीच्या मोटरवाहनांना हे लागू असेल. Bharat NCAP क्रॅश टेस्टसाठी आतापर्यंत 30 कारच्या क्रॅश टेस्टची विनंती आली आहे.

या कारची होईल अगोदर टेस्ट

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स ही पहिली कंपनी आहे, जिने क्रॅश टेस्टसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे टाटाची सफारी आणि हॅरियर या दोन कार या चाचणीतील पहिले वाहन ठरु शकते. या दोन्ही एसयुव्हीला जागतिक NCAP क्रॅश टेस्ट देण्यात आले आहे. यामध्ये या कारला 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. याशिवाय मारुती सुझुकी, हुंदाई, महिंद्रा आणि महिंद्रा या कंपन्या पण या यादीत आहेत.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.