Tata Punch CNG : टाटा पंच सीएनजी एसयुव्ही लाँच, जाणून घ्या मायलेज आणि किंमत
टाटा मोटर्सच्या सीएनजी कॅटेगरीत आणखी एका गाडीची भर पडली आहे. कंपनीने टाटा पंच सीएनजी एसयुव्ही लाँच केली आहे. या गाडीमध्ये काय फीचर्स आहेत आणि किंमत किती ते जाणून घ्या..

मुंबई : टाटा मोटर्सने सीएनजी एसयुव्ही रेंजमध्ये आणखी एका गाडीची भर घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या टाटा पंच सीएनजी एसयुव्ही 4 ऑगस्टला लाँच केली आहे. ही एसयुव्ही पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून खरेदीसाठी उपलब्ध आहे. यात गाडीतील सर्वात मोठी खासियत म्हणजे यात अल्ट्रोज प्रमाणे ड्युअल सीएनजी सिलेंडर दिलं आहे. यामुळे बूट स्पेसमध्ये मोठी जागा मिळते. या गाडीची किंमत प्रतिस्पर्धी असलेल्या ह्युंदाई एक्स्टरच्या सीएनजी व्हेरियंटपेक्षा कमी आहे. टाटा पंच सीएनजी या व्हेरियंटची किंमत 7.10 लाखांपासून 9.68 लाखांपर्यंत (एक्स शोरुम) इतकी आहे.
टाटा पंच सीएनजी व्हेरियंटची किंमत
- टाटा पंच प्युअर : 7 लाख 9 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
- टाटा पंच ॲडव्हेंचर : 7 लाख 84 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
- टाटा पंच ॲडव्हेंचर रिदम : 8 लाख 19 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
- टाटा पंच अकॉम्पलिश्ड : 8 लाख 84 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
- टाटा पंच अकॉम्पलिश्ड डॅझल एस : 9 लाख 67 हजार 900 रुपये (एक्स शोरुम)
टाटा टियागो, टिगोर आणि अल्ट्रोजनंतर टाटाकडून सादर केलेली चौथी सीएनजी मॉडेल आहे. त्यामुळे टाटा सीएनजी पोर्टफोलियो आणखी मजबूत झालं आहे. सीएनजी व्हेरियंटचं प्रत्येक पेट्रोल ट्रिची किंमत 1.60 लाखापर्यंत महाग आहे. पेट्रोल व्हेरियंटची किंमत 6 लाखापासून सुरु होते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये गाडीला 5 स्टार देण्यात आले आहेत.
काय आहे गाडीमध्ये खासियत?
गाडीमध्ये वॉईस असिस्ट इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट सीट आर्मरेस्ट, टाइप सी युएसबी चार्जिंग पोर्ट, शार्क फिन एंटिना, ऑटोमॅटिंग प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डीआरएल, 16 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, सात इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉईड ऑटो, ॲपल कार प्ले, रेन सेंसिंग वायपर्स, हाइट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीटसारखे फीचर्स आहेत. टाटा पंच सीएनजीमध्ये 1.2 लिटर रेवोट्रॉन इंजिन दिलं आहे. यामुळे एसयुव्हीला 73.4 पीएस पॉवर आणि 103 एनएम टॉर्क जनरेट होते.