अवघ्या 6 लाखात दमदार SUV, Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी Tata ची कार लवकरच बाजारात

भारतात SUV सेगमेंट आता खूपच लोकप्रिय झालं आहे. या सेगमेंटमध्ये Tata कंपनीदेखील नवी कोरी कार लांच करणार आहे. (Tata Rs 6 lakh SUV in India, hbx to launch soon)

अवघ्या 6 लाखात दमदार SUV, Creta, Seltos ला टक्कर देण्यासाठी Tata ची कार लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:59 PM

मुंबई : भारतात SUV सेगमेंट आता खूपच लोकप्रिय झालं आहे. ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), किया सोनेट (Kia Sonet), ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) या SUVs ने भारतीय मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. या वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल की, आता प्रीमियम SUV भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Ignis आणि अर्बन SUV लाँच केली आहे. परंतु आता टाटा (Tata) कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा आणि ह्युंदाय या दोन वाहन उत्पादक कंपन्या लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन नव्या SUV लाँच करणार आहेत. (Tata Rs 6 lakh SUV in India, hbx to launch soon)

टाटा ज्या SUV ला मार्केटमध्ये उतरवण्याची तयारी करत आहे त्या एसयूव्हीचं नाव HBX असं आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारची किंमत. ही कार अवघ्या 6 लाख रुपयांच्या किंमतीत भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या कारचे काही फीचर्स हे टाटाच्याच नेक्सॉनप्रमाणे असतील. परंतु या कारचा प्रिमियम लुक ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करेल, यात शंका नाही.

कधी होणार लाँच

टाटाने ऑटो एक्सपो 2020 मध्ये HBX या कारची झलक दाखवली होती. कंपनीने म्हटलं आहे की, जी कार लाँच होणार आहे त्या कारचं 90 टक्के डिझाईन हे एक्सपोमध्ये दाखवण्यात आलेल्या कारप्रमाणेच असेल. टाटा HBX केवळ एका कॉन्सेप्टचं नाव आहे, परंतु ही गाडी टाटा हॉर्नबिल या नावाने सादर केली जाऊ शकते. Tata HBX तिचे प्रतिस्पर्धी Mahindra KUV100 आणि Maruti Suzuki Ignis ला टक्कर देणार आहे.

जबरदस्त इंजिन

एचबीएक्स ही कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे धावेल, हे इंजिन टाटाच्या अल्ट्रॉझ या कारमध्ये देण्यात आलं आहे. हे इंजिन 6000rpm वर 84bhp पॉवर तर 3300rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करु शकेल. ही गाडी 5 स्पीड मॅनुअल आणि एएमटीसह सादर केली जाऊ शकते. Tata HBX ही कार लोकप्रिय ठरली तर Tata या कारसह Altroz चं टर्बो पेट्रोल इंजिनही लाँच करु शकते.

हेही वाचा

Safety Features नसतील तर कार उत्पादन बंद करा; ऑटो कंपन्यांबाबत सरकारची कठोर भूमिका

Hyundai च्या गाड्यांवर 1.5 लाख रुपयांचा बंपर डिस्काऊंट, Santro, Aura आणि इलेक्ट्रिक कारचाही समावेश

भारतात ‘या’ गाड्या 3 लाख रुपयांपेक्षा स्वस्त; देशात सर्वाधिक पसंती

(Tata Rs 6 lakh SUV in India, hbx to launch soon)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.