टाटाच्या या किफायतशीर कारने मोडले सर्व रेकॉर्ड, 4 लाखांहून अधिक लोकांची पसंती

टाटा मोटर्सने (Tata Motors) गुरुवारी जाहीर केले की त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार टियागोने (Tata Tiago) एक नवीन टप्पा गाठला आहे. टियागो हॅचबॅकच्या 4 लाखांहून अधिक युनिट्सचे आतापर्यंत उत्पादन झाले आहे. ही कार 6 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आली होती.

टाटाच्या या किफायतशीर कारने मोडले सर्व रेकॉर्ड, 4 लाखांहून अधिक लोकांची पसंती
Tata Tiago
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 6:50 PM

मुंबई : टाटा मोटर्सने (Tata Motors) गुरुवारी जाहीर केले की त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक कार टियागोने (Tata Tiago) एक नवीन टप्पा गाठला आहे. टियागो हॅचबॅकच्या 4 लाखांहून अधिक युनिट्सचे आतापर्यंत उत्पादन झाले आहे. ही कार 6 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आली होती. आतापर्यंत या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटचे अध्यक्ष राजन अंबा म्हणाले, “टाटा मोटर्ससाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. टियागो (Tiago Hatchback Car) हे पहिले वाहन आहे ज्या वाहनाने इतक्या कमी कालावधीत हा टप्पा गाठला आहे. टियागोला तरुणांचीदेखील पसंती मिळत आहे, ज्यांना स्टाइलसह सुविधा आणि सुरक्षितता हवी आहे आणि या वाहनाच्या खरेदीदारांपैकी 60 टक्क्यांहून अधिक ग्राहकांचे हे पहिले वाहन आहे.

टियागो हॅचबॅकचं डिझाईन ऑटोमेकरच्या इम्पॅक्ट डिझाइन फिलॉसफीच्या अनुषंगाने तयार केलं आहे. टिगॉर, नेक्सॉन या मॉडेल्समध्ये देखील त्याचा वापर करण्यात आला आहे. टाटा टियागो कार लॉन्च झाल्यापासून या कारचे मूळ सिल्हूट सोडून अनेक अपडेट मिळाले आहेत. सध्या हॅचबॅक टियागो आणि टियागो एनआरजी या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, ही कार 14 वेगवेगळ्या ट्रिम पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सीएनजी व्हेरिएंटला मोठी मागणी

टाटा मोटर्सने दावा केला आहे की त्यांनी या सेगमेंटमध्ये 19 टक्के बाजार हिस्सेदारी मिळवली आहे. Tata Tiago पेट्रोल आणि CNG दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. सीएनजीचा पर्याय नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे टियागोची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारमध्ये 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे आणि तेच इंजिन CNG व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

सेफ्टी फीचर्स

सुरक्षिततेच्या दृष्टीने, Tata Tiago ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये चार-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यात ड्युअल एअरबॅग्ज, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल (CSC), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) रीअर पार्किंग असिस्ट सारखे अनेक फीचर्स दिले आहेत.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.