AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात हटके इलेक्ट्रिक स्कूटर; केवळ 10 रुपयात धावणार 60 किमी, जोरदार फीचर्स आणि किंमत पण एकदम कमी

Taxmo Scooty Price : जर तुमचा रोजचा प्रवास 40-50 किलोमीटरपर्यंत असेल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अवघ्या 10 रुपयांच्या चार्जिंगमध्ये कंपनीची स्कूटर 50 ते 60 किलोमीटरचे अंतर कापू शकेल. कोणती आहे ही कंपनी?

बाजारात हटके इलेक्ट्रिक स्कूटर; केवळ 10 रुपयात धावणार 60 किमी, जोरदार फीचर्स आणि किंमत पण एकदम कमी
शानदार सवारी, जानदार सवारी Image Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 12, 2025 | 3:10 PM

गेल्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने वाहन चालकांच्या जीवाला घोर लावला आहे. त्यात दुचाकीच्या किंमती पण लाखांच्या घरात पोहचल्याने त्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या इलेक्ट्रिक स्कूटर अनेकांना योग्य पर्याय वाटत आहे. जर तुमचा रोजचा प्रवास 40-50 किलोमीटरपर्यंत असेल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अवघ्या 10 रुपयांच्या चार्जिंगमध्ये कंपनीची स्कूटर 50 ते 60 किलोमीटरचे अंतर कापू शकेल. विशेष म्हणजे ही स्कूटर कंपनी बजेट फ्रेंडली आहे. त्यासाठी तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागणार नाही. कोणती आहे ही कंपनी?

कोणती आहे ही कंपनी ?

बाजारात VDS कंपनीची TAXMO स्कूटर चर्चेत आहे. या स्कूटरचे सर्वात चांगले वैशिष्ट्ये म्हणजे तिची बॅटरी. या बॅटरी खास करून लिथियम-आयन वा लीड-ॲसिड बॅटरीवर चालतात. या स्कूटर कमी खर्चात अधिक अंतर कापतात. जर वीजेसाठी प्रति युनिट 8 रुपये खर्च ग्राह्य धरला तरी एका इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 यूनिट खर्च येतो. एक बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 10 ते 12 रुपयांच्या दरम्यान खर्च येतो. चार्जिंगनंतर ही स्कूटर आरामशीर 50 ते 60 किलोमीटर अंतर कापते. या स्कूटरची किंमत 50 हजार रुपये इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

कमी खर्चात जास्त अंतर

एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 50-60 किलोमीटरचे अंतर कापते. पेट्रोलच्या मानाने हा खर्च कमी आहे. ही स्कूटी पर्यावरण अनुकूल आहे. त्यामुळे प्रदूषण टळते. इलेक्ट्रिक स्कूटरला इंजिन नसते. त्यामुळे तिच्या सर्व्हिसिंगची गरज पडत नाही. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर सध्या सबसिडी देते. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होतो.

इलेक्ट्रिक स्कूटीचा पर्याय योग्य का?

जर तुम्ही दररोज 40-50 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापत असाल तर इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. पण चार्जिंग आणि बॅटरी लाईफबाबत काळजी घ्यावी लागते. अवघ्या 10 रुपयांच्या चार्जिंगमध्ये 60 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर सर्वसामान्यांसाठी फायदेशीर पर्याय आहे. तिची किंमत सुद्धा कमी आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.