Self Drive Car | ‘या’ कंपनीच्या फुल सेल्फ-ड्राइव्ह कारमुळे जगातील पहिला मृत्यू ?
Full Self Driving Car | फुल सेल्फ-ड्राइव्ह कारच्या दिशेने जगाचा प्रवास सुरु झाला आहे. पण अशा कार खरोखरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. कारण अशाच एका सेल्फ ड्राइव्ह कारमुळे एक अपघात झाला.
Self drive car | सामान्य कारमध्ये ड्रायव्हर असतो. पण आता जग त्यापुढे गेलं आहे. जगात आता अशा काही कंपन्या आहेत, ज्या सेल्फ ड्राइव्ह कारची निर्मिती करत आहेत. यात एलन मस्करची टेस्ला कंपनी सेल्फ ड्राइव्ह कारसाठी प्रसिद्ध आहे. टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक कार मेकिंग कंपनी आहे. सध्या फुल सेल्फ ड्राइव्ह कार बनवण्याचे या कंपनीने सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पण या कारने आपल्याच कर्मचाऱ्याचा जीव घेतला. टेस्लावर आरोप आहे की, त्यांच्या फुल-सेल्फ ड्राइव्ह कारमुळे हंस वॉन ओहैन या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
2022 मध्ये टेस्ला कर्मचारी फैन हंस वॉन ओहैनचा टेस्लाच्या सेल्फ ड्राइव्ह कारमुळे मृत्यू झाला होता. टेस्लाच्या मॉडल 3 चा अपघात झाला. गाडीला आग लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या अपघातातून बचावलेल्या एरिक रॉसिटरने सांगितलं की, अपघाताच्यावेळी सेल्फ ड्राइव्ह फिचर एक्टिव होतं.
गाड्या अजून पूर्णपणे ऑटोनॉमस नाहीयत
हा आरोप खरा ठरला, तर फुल सेल्फ-ड्राइव्ह कारशी संबंधित हा पहिला मृत्यू असू शकतो. कारमधील सेफ्ल ड्राइव्हच्या फिचरने नियम बनवणाऱ्यांच लक्ष वेधून घेतलय. रिपोर्ट्सनुसार टेस्लाच्या गाड्या अजून पूर्णपणे ऑटोनॉमस नाहीयत. ड्राइव्हर्सना या कंट्रोल करण्यासाठी तयार असलं पाहिजे.
ऑटोपायलट मोडमुळे अपघात
नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनकडून आधीपासूनच टेस्लाच्या ऑटोपायलट मोडची तपासणी सुरु आहे. 2019 पासून टेस्लाच्या ऑटोपायलट मोडमुळे होणाऱ्या अपघाताच प्रमाण वाढलं आहे. 700 अपघातात 17 प्राणघातक होते.
FSD मुळे टेस्लाच्या कार वेगळी असल्याचा दावा
टेस्लाचे आपल्या सेल्फ ड्राइव्ह कारबद्दल बरेच दावे आहेत. FSD मुळे ओहैनचा मृत्यू झाल्याच टेस्लाने मान्य केलेलं नाही. एलन मस्कने 2022 मध्ये दावा केला होता की, FSD मुळे टेस्लाच्या कार दुसऱ्या कंपनीपेक्षा वेगळ्या आहेत.