Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ असेल Tesla ची भारतातील पहिली कार, कंपनी गुजरातमध्ये कामकाज सुरु करणार?

मोठ्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे.

'ही' असेल Tesla ची भारतातील पहिली कार, कंपनी गुजरातमध्ये कामकाज सुरु करणार?
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 5:51 PM

मुंबई : अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे. दरम्यान इकोनॉमिक टाईम्सच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की, टेस्ला गुजरातमध्येदेखील बिझनेस सुरु करण्यासाठी तयारी करत आहे. (Tesla may soon start operations in Gujarat, Model 3 sedan will be launch first in India)

गुजरात राज्य गेल्या काही वर्षांपासून ऑटोमोबाईल कंपन्यांचं पसंतीचं राज्य ठरत आहे. त्यातही प्रामुख्याने इलेक्ट्रिक कार्सच्या बाबतीत गुजरात सध्या सर्वात पुढे आहे. दरम्यान आता लक्झरी इलेक्ट्रिक कार्स बनवणारी कंपनी टेस्लादेखील गुजरातमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच टेस्ला कर्नाटक आणि गुजरातसह महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही बिझनेस सुरु करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी कंपनीकडून बातचित सुरु आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे (CMO) अॅडिशनल चीफ सेक्रेटरी मनोज दास यांनी ETAuto शी बोलताना सांगितले की, “गुजरात राज्य सरकार टेस्लासोबत चर्चा करत आहे. या ईव्ही (इलेक्ट्रिक व्हीकल) उत्पादक कंपनीस राज्यात बेस स्थापित करण्यासाठी सर्व शक्य मदत आणि प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.” दास म्हणाले की, “जगातील बहुतेक अव्वल ऑटोमोबाईल कंपन्यांनी राज्यात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स उभारले आहेत. सर्व आघाडीच्या कंपन्यांनी गुजरातमध्ये ऑटोमोबाईल हब बनवले आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक आणि वाहन बॅटरी उत्पादक कंपन्या गुजरातमध्ये सुविधा स्थापित करत आहेत. आम्हाला आशा आहे की, टेस्लालाही इतर जागतिक वाहनधारकांप्रमाणे त्याचा फायदा होईल. ”

मॉडल 3 सेडान पहिला प्रकल्प असेल

मिळालेल्या माहितीनुसार टेस्ला कंपनी यावर्षी जूनपर्यंत त्यांची पहिली कार भारतात लाँच करु शकते. किफायतशीर कार टेस्ला मॉडेल 3 सेडान हे टेस्लाचं भारतातील पहिलं प्रोडक्ट असेल. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, ही बेस्टसेलिंग आणि बजेट कार मॉडल 3 या वर्षीच्या (2021) पहिल्या सहामाहित सादर केली जाऊ शकते.

हेही वाचा

अवघ्या 20 ते 40 हजारात सेकंड हँड Bajaj Avenger, V15, Super Splendor खरेदी करा!

Okinawa Scooter | स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, लायसन्सचीही गरज लागणार नाही, किंमत फक्त…

(Tesla may soon start operations in Gujarat, Model 3 sedan will be launch first in India)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.