Tesla च्या भारतात 7 ईव्ही लाँच होणार, केंद्र सरकारची मंजुरी, जाणून घ्या लाँचिंग कधी
एलोन मस्कच्या मालकीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला (Tesla) भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आणखी तीन ट्रिम्ससाठी मंजुरी मिळाली आहे, देशात त्यांचे एकूण सात व्हेरिएंट स्वीकारले गेले आहेत.
मुंबई : एलोन मस्कच्या मालकीची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला (Tesla) भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आणखी तीन ट्रिम्ससाठी मंजुरी मिळाली आहे, देशात त्यांचे एकूण सात व्हेरिएंट स्वीकारले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवरील अपडेट्सनुसार टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (टाइम) म्हणून नोंदणीकृत असलेल्या टेस्लाच्या तीन नवीन मॉडेल्ससाठी मंजुरी मिळाली आहे. (Tesla now has 7 EV variants approved in India)
टेस्लाला ऑगस्टमध्ये त्यांच्या चार कार मॉडेल्ससाठी होमोलोगेशन सर्टिफिकेट मिळाले आहेत. आणखी तीन प्रमाणपत्रांसह, इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याकडे आता भारतात सात स्वीकृत वाहने आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, टेस्लाचे नेमके कोणते व्हेरिएंट मंजूर केले गेले आहेत ते स्पेसिफाय केलेले नाहीत. तथापि, मॉडेल 3S आणि मॉडेल YS भारतीय रस्त्यांवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, होमोलोगेशन सर्टिफिकेटवाल्या लेटेस्ट तीन वाहनांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
अनेकदा टेस्टिंगदरम्यान टेस्ला कार्सचं भारतात दर्शन
काही टेस्ला टेस्टिंग युनिट्स नियमितपणे भारतातील स्थानिक रस्त्यांवर नेव्हिगेट करत आहेत. तथापि, यूएस-आधारित ईव्ही निर्मात्याने अद्याप स्थानिक उत्पादनासाठी कोणतीही गंभीर पावले उचललेली नाहीत. टेस्ला अजूनही भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या प्रतीक्षेत आहे. ईव्ही-निर्माता अद्याप बाजारात प्रवेश करण्यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्यासाठी केंद्राशी चर्चा करत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, मस्क म्हणाले होते की, टेस्ला इंपोर्ट केलेल्या वाहनांसह यशस्वी झाल्यास भारतात टेस्ला कारखाना शक्य आहे. अहवालानुसार, काही सूत्रांनी सांगितले की टेस्लाने भारतात पाठवल्या जाणार्या वाहनांचे आयात शुल्क किमान 40 टक्क्यांनी कमी करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून अमेरिकन कंपनीला देशातील ट्रायल्सच्या मागणीला मदत करता येईल. तथापि, टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या जागतिक लाइनअपचा विचार करता, त्यांना कोणतेही प्रोत्साहन मिळण्याची शक्यता कमी आहे.
इतर बातम्या
Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात
Honda Brio ते Maruti Swift Dzire, 3 लाखांहून कमी किंमतीत 5 टॉप क्लास कार खरेदीची संधी
(Tesla now has 7 EV variants approved in India)