Tesla | टेस्ला भारतात लाँच करणार स्वस्त कार! कसं आणि काय असेल खासियत जाणून घ्या

टेस्ला कारबाबत कारप्रेमींमध्ये कायम उत्सुकता राहिली आहे. पण केंद्र सरकारकडून टेस्ला अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. असं असताना टेस्लाने भारतीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून एक प्लान आखला आहे.

Tesla | टेस्ला भारतात लाँच करणार स्वस्त कार! कसं आणि काय असेल खासियत जाणून घ्या
Tesla | टेस्ला भारतात लाँच करणार स्वस्त कार! कसं आणि काय असेल खासियत जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:57 PM

मुंबई : टेस्ला कंपनीच्या कारबाबत कारप्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. कारचं डिझाईन, त्यातील फीचर्स याची कायम चर्चा होत असते. पण असं असलं तरी भारतीय रस्त्यावर टेस्लाची कार काही धावताना दिसत नाही. केंद्र सरकारच्या कठोर धोरणांमुळे टेस्लाच्या भारत आगमनाचं मार्ग खडतर झाला आहे. देशांतर्गत गाड्यांची निर्मिती करावी आणि विक्री करावी अशी अट आहे. त्यामुळे टेस्लाची गोची झाली आहे. कारची किंमतही लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे काही वर्गाला ही कार घेणं परवडणारी नाही. असं असताना आता टेस्लाने भारतीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून कार तयार करण्याची योजना आखली आहे. या कारची किंमत 20 लाख रुपये असं सांगण्यात येत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टेस्ला कंपनीचे प्रतिनिधींनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत.

टेस्ला भारतात लाँच करणार कार

पियुष गोयल यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत भारतातच कारची निर्मिती आणि बजेटमध्ये बसणारी इलेक्ट्रिक कार तयार करणार असल्याची चर्चा होणार आहे. यासाठी स्थानिक कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. या प्लांटमध्ये भारतीय ग्राहक डोळ्यासमोर ठेवून स्वस्त इलेक्ट्रिक कार तयार करण्याचा मानस आहे. इतकंच काय तर या प्लांटमधून इतर देशांमध्ये कारची निर्यात केली जाणार आहे.

वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांच्या चर्चेतून टेस्लाचा प्लांट भारतात येईल असंच दिसत आहे. यापूर्वी टेस्लाने आयात कर कमी करण्याची मागणी केली होती. पण सरकारनं आपली भूमिका ठाम ठेवून कार निर्मिती भारतातच करावी अशी अट ठेवली. यामुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं सांगण्यात येत आहे.

टेस्ला कंपनी भारतात आल्यास ऑटो क्षेत्रात मोठी उलथापालथ होणार आहे. भारतातील तयार केल्या जाणाऱ्या कारची किंमत 20 लाखांपर्यंत असू शकते. म्हणजेच जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत ही किंमत 25 टक्क्यांनी कमी असेल.सध्या टेस्लाची मॉडेल 3 सेडान कार चीनमध्ये 26.32 लाखांना मिळत आहे.

भारतांच्या अटींवर टेस्लाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टेस्ला आणि केंद्र सरकार यांच्यात जूनपासून चर्चा होत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि भारतात गुंतवणुकीबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर वेगाने हालचाली होताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?
मोदींना आता विदेश पर्यटन करता येणार नाही कारण.., सामनातून काय निशाणा?.
बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?
बोल तो वो रहे है? पर शब्द किसके है? मिटकरींच्या इशाऱ्याला बळ कुणाचं?.
चालीसा, पुष्पा ते बाण... कोण कुणाला कॉपी करतंय? नवनीत राणांचा दावा काय
चालीसा, पुष्पा ते बाण... कोण कुणाला कॉपी करतंय? नवनीत राणांचा दावा काय.
मविआत CM कोणाचा? दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
मविआत CM कोणाचा? दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?.
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका
उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, ठाकरेंची जळजळीत टीका.
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा
'दगा एक बार हो सकता है, बार बार...', नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा.
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान
भेटता कसले,हिम्मत असेल तर राजीनामा द्या; आव्हाडांचं दादांना खुल आव्हान.
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा
वेळ आली तर ठाकरेंसाठी तलवारीचे वार घेऊ... त्या बॅनर्सची का होतेय चर्चा.
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?
मी कोल्हापूरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?.
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार
मी ओरिजनल,शेवटी ब्रँड हा ब्रँड, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर पलटवार.