पल्सर, चेतक, ॲव्हेंजरची गगन भरारी… ‘या’ बाईकचा बाजार उठला…
बजाज प्लॅटिना ही पल्सरनंतर दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली आहे. प्लॅटिनाची या वर्षी 17336 युनिटची विक्री झाली असून मागील वर्षी हा आकडा 11164 होता. बजाजच्या एकूण बाईक्सच्या विक्रीमध्ये प्लॅटिनाचा हिस्सा 18.63 टक्के इतका होता.
बजाज पल्सर ही या वर्षी मेमध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली आहे. तर दुसर्या क्रमांकावरील प्लॅटिना (Platina) तुलनेत बरीच मागे दिसून येत आहे. स्कूटर सेगमेंटबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षीच्या तुलनेत बजाज चेतक (Bajaj Chetak) च्या विक्रीमध्येही बरीच तेजी दिसून आली आहे. तर दुसरीकडे बजाजचे सीटी मॉडेल या वर्षी अतिशय वाईट कामगिरीतून जात असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत याची विक्री जवळपास 83.63 टक्के कमी झाली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. बजाजच्या एकूण विक्री झालेल्या बाईक्सबाबत बोलायचे झाल्यास, यात एकट्या पल्सरचा (Pulsar) वाटा 74.40 टक्के इतका आहे. या वर्षी मे महिन्यात पल्सच्या 69241 युनिटची विक्री झाली आहे. तर मागील वर्षी मेमध्ये केवळ 39623 युनिटचीच विक्री होउ शकली होती. म्हणजे पल्सरच्या विक्रीमध्ये तब्बल 74.75 टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत आहे.
प्लॅटिना ठरली सेकंड रनरअप
बजाज प्लॅटिना ही पल्सरनंतर दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली आहे. प्लॅटिनाची या वर्षी 17336 युनिटची विक्री झाली असून मागील वर्षी हा आकडा 11164 होता. बजाजच्या एकूण बाइक्सच्या विक्रीमध्ये प्लॅटिनाचा हिस्सा 18.63 टक्के इतका होता.
बजाज सिटीची सर्वात खराब कामगिरी
बजाजच्या सीटी मॉडेलची स्थिती या वेळी सर्वाधिक वाईट राहिली आहे. या वर्षी मेमध्ये सीटीचे केवळ 1257 युनिटची विक्री झालेली आहे. गेल्या वर्षी 7678 दुचाकींची विक्री झालेली होती. म्हणजेच या वर्षी सिटीच्या विक्रीमध्ये तब्बल 83.63 टक्के घसरण झालेली दिसून येत आहे. बजाजच्या एकूण विक्री झालेल्या बाईक्समध्येही सिटीची टक्केवारी केवळ 1.35 टक्के इतकीच होती.
Avenger आणि Dominar च्या विक्रीमध्ये वाढ
बजाजच्या Avenger आणि Dominar बाइकच्या विक्रीमध्येही या वर्षी मेमध्ये चांगली वाढ झाल्याचे बघायला मिळाले. या वेळी Avenger ची 2112 युनिटची विक्री झाली मागील वर्षी हा आकडा केवळ 732 युनिट इतका होता. तर दुसरीकडे Dominar बाबत बोलायचे झाल्यास मागील वर्षी मेमध्ये 121 बाइकची विक्री झालेली होती. या वर्षी हा आकडा वाढून 1211 इतका झाला आहे. बजाजच्या एकूण बाइक विक्रीमध्ये यांचा अनुक्रमे 2.27 आणि 1.30 टक्के इतका वाटा आहे.
बजाज चेतकने तोडला रेकॉर्ड
बजाजच्या चेतक स्कूटरबाबत बोलायचे झाल्यास, मागील वर्षी मेच्या तुलनेत या वर्षी या स्कूटकच्या विक्रीत तब्बल 8106 टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील वर्षी एकूण 31 चेतक स्कूटरची विक्री झालेली होती. या वर्षी मात्र यात वाढ होउन 2544 स्कूटरची विक्री झालेली आहे. बजाजच्या एकूण विकलेल्या बाइक्समध्ये याचा 2.73 टक्के हिस्सा आहे.