जुनी कार पण टकाटक राहणार, Jio डिव्हाईसने खडानखडा माहिती मिळणार

Jio Device | जिओने आता कारसाठी खास डिव्हाईस आणले आहे. या डिव्हाईसच्या वापराने कार चोरी जाणार नाही असा दावा करण्यात येत आहे. तर कारचे इंजिन दुरुस्त राहिल, कारचा परफॉर्मन्स सुधारेल आणि चारचाकी चालविण्याचा अनुभव अजून चांगला होईल, असा दावा करण्यात येत आहे. रिलायन्सच्या या नवीन डिव्हाईसची सध्या बाजारात चर्चा आहे.

जुनी कार पण टकाटक राहणार, Jio डिव्हाईसने खडानखडा माहिती मिळणार
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 2:38 PM

नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : रिलायन्स जिओने जुन्या कार स्मार्ट करण्यासाठी खास डिव्हाईस आणले आहे. JioMotive असे या डिव्हाईसचे नाव आहे. कारमध्ये हे डिव्हाईस कनेक्ट झाल्यावर ते कारला स्मार्ट करते. या डिव्हाईसमुळे कारचे लोकेशन ट्रॅक होते. कारची चोरी थांबविण्यासाठी या डिव्हाईसमध्ये अलर्टची सुविधा देण्यात आली आहे. जुन्या कारला कनेक्टेड एक्सपीरिएन्स देण्याचा खटाटोप या नवीन डिव्हाईसमुळे शक्य होत आहे. हे डिव्हाईस त्या कारला पण स्मार्ट करेल. ज्यांच्यामध्ये स्मार्ट फीचर्स इन बिल्ट नाही. सध्या बाजारात या डिव्हाईसची चर्चा आहे.

अशी होईल मदत

नवीन कार इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारख्या फीचरसह येतात. या कार स्मार्टफोनने कनेक्ट होतात. या कार ताज्या दमाच्या फीचर्ससह येतात. कंपनीनच्या दाव्यानुसार JioMotive OBD एडाप्टरचा उपयोग तुमचा एकूणच अनुभव समृद्ध करेल. कारची खडानखडा माहिती मिळेल. या डिव्हाईसमुळे लोकेशन, इंजिनचे आरोग्य, कार चालविण्याचा अनुभव समजण्यास मदत होईल. फीचर्स नसलेल्या कारसाठी पण हे डिव्हाईस मदतीला येईल.

हे सुद्धा वाचा

JioThings एप डाऊनलोड करा

JioMotive एक प्लगअँड प्ले डिव्हाईस आहे. याचा वापर करण्यासाठी कारमध्ये मोठे बदल करण्याचे गरज नाही. तर मोठ्या सोप्यारित्या हे डिव्हाईस कारमध्ये फीट करता येईल. युझर्सला Google Play Store वा Apple App Store मध्ये JioThings एप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी Jio क्रमांकावरुन साईन अप करावे लागेल.  साईन केले आणि डिव्हाईस बसवल्यावर त्यासंबंधीची अपडेट या एपच्या माध्यमातून फीड करावी लागेल. त्यामुळे कारसंबंधीची माहिती मोबाईलवरील एपमध्ये मिळेल. तसेच कार चोरीविषयीचा अलर्ट मिळेल.

असे करेल काम

हे डिव्हाईस कारमध्ये इन्स्टॉल केल्यावर JioMotive, कारची बॅटरी, इंजिन लोड, कुलेट टेम्प्रेचर, एअर इनटेक आणि वाहनासंबंधीची इतर माहिती देईल. कंपनीच्या दाव्यानुसार, 200 पेक्षा जास्त इंजिन डायग्नोस्टिक कोड यामध्ये आहे. त्यामुळे इंजिनची क्षमता तपासता येईल. हे डिव्हाईस देशातील रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक रिलायन्स डिजिटलवरुन सुद्धा ते खरेदी करु शकतात. या डिव्हाईसची किंमत 4,999 रुपयांपर्यंत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.