Mercedes-Benz : विना चालक धावणार कार! मर्सिडीज-बेंझला ग्रीन सिग्नल, टेस्लाला मिळाली धोबीपछाड

Mercedes-Benz : विना चालक कारचे स्वप्न आता फार दूर नाही. स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे या कार लवकरच रस्त्यावर धावतील. अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्ये त्यासाठी चूरस आहे..

Mercedes-Benz : विना चालक धावणार कार! मर्सिडीज-बेंझला ग्रीन सिग्नल, टेस्लाला मिळाली धोबीपछाड
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 2:26 PM

नवी दिल्ली : विना चालक कारचे (Car without Driver) स्वप्न आता फार दूर नाही. स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या आधारे या कार लवकरच रस्त्यावर धावतील. अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्ये त्यासाठी चूरस सुरु आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, रस्त्याची, वाहनांच्या गर्दीची अचूक माहिती देणारे अद्ययावत तंत्रज्ञान यांच्या मदतीने ही कार रस्त्यावरुन दिमाखात धावेल. आतापर्यंत काही कंपन्यांनी या कार विकसीत करुन त्याची चाचणी पण केली आहे. आता सार्वजिनक रस्त्यावर धावणाऱ्या स्वयंचलित कारसाठी (Automated Driving Technology) मर्सिडीज-बेंझला ग्रीन सिग्नल मिळाले आहे. टेस्ला कंपनीवर याबाबतीत बेंझने मात केली आहे.

कॅलिफोर्नियाने दिली परवानगी कॅलिफोर्नियाच्या मोटर वाहन विभागाने गुरुवारी यासाठीची परवानगी दिली. त्यामुळे मर्सिडीज-बेंझची (Mercedes-Benz) ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीवर आधारीत कार काही अटींसह सार्वजनिक रस्त्यांवरुन धावेल. कॅलिफोर्निया ही तशी टेस्लाची (Tesla) बाजारपेठ आहे. या ठिकाणी टेस्लाच्या कारची मोठ्या प्रमाणात विक्री होते. गेल्यावर्षी टेस्लाचा या ठिकाणच्या बाजारपेठेत 16 टक्के हिस्सा होता. जागतिक वृत्तसंस्था रॉटर्सने याविषयीचे वृत्त दिले आहे.

टेस्लावर मात जर्मनीची कार उत्पादक मर्सिडीज बेंझने या नवीन तंत्रज्ञानाआधारे कार थेट उतरविण्यात टेस्लावर मात केली आहे. आता बेंझ त्यांच्या कार थेट विक्री करु शकतील वा भाड्याने देऊ शकतील. कॅलिफोर्नियातील वाहतूक विभागाने त्यासाठीची रीतसर परवानगी या जर्मनीच्या कंपनीला दिली आहे.

हे सुद्धा वाचा

लेव्हल3 कार कॅलिफोर्नियाच्या वाहतूक विभागाने मर्सिडीज-बेंझच्या लेव्हल-3 कारसाठी ड्राईव्ह पायलट प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. यामध्ये चालकाला डोळे झाकून प्रवास करता येईल. पण कारचे नियंत्रण त्याला त्याच्याकडेच ठेवावे लागणार आहे. तसेच वेगावर पण त्याला आवर घालावी लागणार आहे.

किती असावा वेग Drive Pilot या प्रकल्पाला मंजूरी देताना काही अटी ठेवण्यात आल्या. त्यानुसार, महामार्गावरुन कार धावताना एक निश्चित मर्यादा पाळावी लागणार आहे. त्यासाठी 40 मैल प्रति एक तास ही वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे.

पुढील वर्षात कार रस्त्यावर मर्सिडीज बेंझने कार उत्पादनाविषयी माहिती दिली. त्यानुसार, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टिम पुढील वर्षी अमेरिकेच्या बाजारात उपलब्ध असेल. 2024 मध्ये S-Class आणि EQS Sedan ही मॉडेल उपलब्ध असतील. यावर्षानंतरच ही मॉडेल बाजारात दाखल होतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.

हे तंत्रज्ञान किती सुरक्षित ऑटोमॅटिक कार आल्याने सेफ्टी फिचर्स वाढले आहेत. कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्याने सुरक्षित प्रवासाची हमी मिळते. पण प्रत्येक देशातील ट्रॅफिकचे नियम, त्या नियमांचे पालन करणारे नागरिक यांच्या चुका या तंत्रज्ञानासाठी अडचणीचे आणि धोकादायक ठरु शकते. स्वयंचलित वाहनांना बेशिस्त, गर्दीच्या ठिकाणी चालविणे हे तंत्रज्ञानाचे कौशल्यच ठरेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.