निस्त्या गाड्यांमागून गाड्या ! जूनमध्ये लेटेस्ट कारचा धमाका… महिंद्रा स्कॉर्पियोपासून ह्युंडाईपर्यंतच्या ‘या’ न्यू ब्रँड कारची एंट्री

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात पुढील महिन्यात अनेक नवीन कार लाँच करण्यात येणार आहे. यात, महिंद्रा स्कॉर्पियोसह विविध नवीन कारची एंट्री होणार आहे. यातील अनेक कार आपआपल्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ठ ठरतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

निस्त्या गाड्यांमागून गाड्या ! जूनमध्ये लेटेस्ट कारचा धमाका... महिंद्रा स्कॉर्पियोपासून ह्युंडाईपर्यंतच्या ‘या’ न्यू ब्रँड कारची एंट्री
जूनमध्ये लेटेस्ट कारचा धमाका
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 6:15 PM

पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये अनेक नवीन कार्सची एंट्री होणार आहे. जूनमध्ये जवळपास पाच नवीन कार लाँच होण्याच्या तयारीत आहेत. यात महिंद्रा (Mahindra) स्कॉर्पियो फेसलिफ्ट, ह्युंडाई आईनिक 5 (Hundai Ioniq 5), फॉक्सवेगन विरटस (Volkswagen Virtus), होंडा सिटी, स्कोडा स्लाविडा, मारुती सिआज आणि ह्युंडाई व्हरनाचा सहभाग असणार आहे. यातील चार कंपन्यांनी आपल्या कार लाँचिंगला दुजोरा दिला आहे. लवकरच उर्वरित कंपन्या आपल्या कार लाँचिंगची माहिती जाहिर करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जूनमध्ये लाँच होणार्या काही कारची माहिती जाणून घेउया…

1) महिंद्रा स्कॉर्पियो फेसलिफ्ट : महिंद्रा ॲण्ड महिद्रा कंपनी पुढील महिन्यात महिंद्रा स्कॉर्पियोचे आपले नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. कंपनीने आपल्या नवीन कारच्या टीझरमधून आधीच बरीचशी माहिती समोर आणली आहे. या नवीन गाडीत डिझाईनचे 18 इंचाचे अलॉय व्हील मिळणार आहे. यात, 2.0 लीटरचे एम स्टालिंग फार सिलेंडर पेट्रोल इंजीन मिळणार आहे. दुसर्या पर्यायामध्ये 2.2 लीटर एम हाक फॉर सिलेंडर डिझेल इंजीन मिळणार आहे.

2) ह्युंडाई आईनिक 5 : ह्युंडाई मोटर्स इंडिया पहिलेच आपल्या ऑफिशिअल वेबसाइटवर आईनिक 5 इलेक्ट्रिक क्रोसओवर कारला लिस्टेड केले आहे. कोरियन कार निर्माता कंपनीने आधीच जाहिर केलेय, की आईनिक 5 भारतामध्ये दुसर्या सहामाहित लाँच करण्यात येणार आहे. परंतु अजूनपर्यंत लिक झालेल्या रिपोर्टनुसार, ही कार आता जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनी 2028 सालाच्या आधी 6 नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्यातील एक ह्युंडाई आईनिक आहे.

हे सुद्धा वाचा

3) फॉक्सवेगन विरटस : जर्मन कार निर्माण कंपनी फॉक्सवेगनने आधीच जाहिर केल्यानुसार 9 जून रोजी ती आपल्या अपकमिंग कारची माहिती ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. कंपनी लाँच करत असलेल्या कारचे नाव फॉक्सवेगन विरटस असे असणार आहे. ही कार जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक लांबीची कार राहणार आहे. या कारची लांबी 4561 एमएम आहे. सोबतच कारमध्ये 521 लीटरचा बूट स्पेस देण्यात येत आहे. या कारमध्ये 1.5 लीटरचा टीएसआई ईवो इंजीन देण्यात आला आहे.

4) सिट्रोन सी3 : ही एसयुव्ही कारदेखील पुढील महिन्यात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. फ्रांस कार निर्माता कंपनीची ही भारतातील दुसरी कार ठरणार आहे. या आधी कंपनीने सी5 एअरक्रोस एसयुव्ही कारला बाजारात आणले होते. ही एक काम्पक्ट कार असेल. ही कार टाटा पंचशी स्पर्धा करेल. सिट्रोएन सी3 ला कॉमन मॉड्यूलर प्लेटफार्मवर तयार करण्यात आले आहे. ज्यात, 2504 एमएमचा व्हीलबेस देण्यात आला आहे. या कारमध्ये मोठा लेगरुम देण्यात आला आहे. सोबत 315 लीटरचा बूट स्पेसही उपलब्ध आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.