ठरलं ! 1 सप्टेंबरला लाँच होणार नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक, जाणून घ्या वैशिष्ट्ये

या बाईकला Meteor 350 चे 349 सीसीचे सिंगल-सिलिंडर, DOHC इंजिन मिळेल, तथापि पॉवरट्रेनच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची अद्याप पुष्टी झालेली नाही. याशिवाय, पूर्वीप्रमाणे 5-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध असेल.

ठरलं ! 1 सप्टेंबरला लाँच होणार नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक, जाणून घ्या वैशिष्ट्ये
1 सप्टेंबरला लाँच होणार नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 8:08 PM

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित बाईक रॉयल एनफील्डच्या नवीन क्लासिक 350 ची लाँचिंग तारीख अखेर ठरली आहे. पुढच्या आठवड्यात 1 सप्टेंबर रोजी नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक लाँच होणार आहे. रॉयल एनफिल्डचे चाहते आतुरतेने बाईकची वाट पाहत आहेत आणि आता कंपनीने या बाईकच्या लॉन्चची तारीख निश्चित केली आहे. 1 सप्टेंबर रोजी नवीन जनरेशनची क्लासिक 350 बाईक लॉन्च करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यापूर्वी ही बाईक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च होणार असल्याची चर्चा होती, परंतु कंपनीने आता 1 सप्टेंबरला ‘ब्लॉक योअर डेट’ आमंत्रण शेअर करून याची पुष्टी केली आहे. (The new Royal Enfield Classic 350 bike will launch on September 1, know Features)

जर बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर जुन्या लीक झालेल्या फोटोंनुसार, नवीन जनरेशनची रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक आत आणि बाहेर दोन्हीकडे पूर्णपणे नवीन असेल. हे Meteor 350 च्या जे-प्लॅटफॉर्मवर सादर केले जाईल आणि नवीन चेसिस, मीटर कन्सोल आणि इतर गोष्टींसह स्विंगआर्मसह प्रमुख अपडेट पहायला मिळतील. यासह, बाईकच्या डिझाईनमध्ये बरेच नवीन बदल देखील पाहिले जाऊ शकतात.

349cc सिंगल-सिलेंडरसह सुसज्ज असेल क्लासिक 350

या बाईकला Meteor 350 चे 349 सीसीचे सिंगल-सिलिंडर, DOHC इंजिन मिळेल, तथापि पॉवरट्रेनच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची अद्याप पुष्टी झालेली नाही. याशिवाय, पूर्वीप्रमाणे 5-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध असेल. अपडेटेड इंजिन आणि फ्रेम व्यतिरिक्त, बाईकला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह नवीन मीटर कन्सोल मिळेल. हे फंक्शन आधी Meteor 350 मध्ये पाहिले गेले आहे.

1.85 लाखांपासून सुरू होऊ शकते किंमत

नवीन पिढीच्या क्लासिक 350 मध्ये अपडेटेड तंत्रज्ञान आणि मेकॅनिकल्स मिळतील आणि त्याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असेल. लॉन्च दरम्यान या बाईकची एंट्री लेव्हल किंमत 1.85 लाख (एक्स-शोरूम) ते 2.20 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असेल. ही बाईक Honda H’Ness CB350 आणि Jawa बाईक्सशी स्पर्धा करेल. या बाईक व्यतिरिक्त कंपनी पुढील काही महिन्यांत अनेक नवीन बाईक्स लाँच करणार आहे. (The new Royal Enfield Classic 350 bike will launch on September 1, know Features)

इतर बातम्या

मारुती सुझुकीचा इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटचा विचार नाही, हे आहे कारण

नागपूर मेट्रोमध्ये पदभरती घोटाळा; ओबीसी, एससी, एनटीच्या उमेदवारांना डावलले, खुल्या प्रवर्गावर प्रशासन मेहरबान ?

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.