SUV car entries : पुढील दोन आठवड्यात ‘या’ 5 SUV कारची एंट्री होणार

येत्या दोन आठवड्यांत महिंद्राची इलेक्ट्रिक कारदेखील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या अपकमिंग कारचे नाव Mahindra XUV 400 असू शकते. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आपला ठसा उमटविण्यासाठी महिंद्रा प्रयत्न करीत असली तरी हा मार्ग इतका सोपा नसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

SUV car entries : पुढील दोन आठवड्यात ‘या’ 5 SUV कारची एंट्री होणार
या’ 5 SUV कारची एंट्री होणार
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 11:43 AM

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पुढील दोन आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. आगामी दोन आठवड्यांत एक-दोन नव्हे तर तब्बल 5 SUV कार बाजारात दाखल होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये ह्युंदाई व्हेन्यू एन लाईन (Hyundai Venue N) तसेच टाटा कार्सचा समावेश आहे. अपकमिंग कार अनेक नवीन फीचर्स आणि नवीन पेंट थीमसह दाखल होणार आहे. सध्याच्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार टाटा मोटर्सच्या आहेत. टाटा टिगोर आणि नेक्सॉन EV सारख्या कार भारतात आहेत. टाटाला स्पर्धा करण्यासाठी अनेक कार निर्माता कंपन्यांनी आपल्या विविध कार व्हेरिएंटला आता इलेक्टिक सेगमेंटमध्ये (electric segment) उतरविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. यात, टायोटा, महिंद्रा (Mahindra) आदी कंपन्यांचा समावेश आहे. आगामी काळात कोणत्या नवीन कार बाजारात दाखल होणार आहेत, याची सविस्तर माहिती या लेखातून घेणार आहोत.

1) Hyundai Venue N-Line

Hyundai आपली पहिली कॉम्पॅक्ट SUV कार व्हेन्यू N लाइनअपमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीच्या एन लाइनअपमधील ही दुसरी कार आहे, याआधी कंपनीने एन लाइनअपसह i20 आणली आहे. 6 सप्टेंबर रोजी नवीन व्हेन्यू एन लाइन दाखल होणार आहे. या आगामी कारमध्ये नवीन पेंट थीम आणि स्पोर्टी एक्सटीरियर्स पाहता येतील. या कारमध्ये नवीन अलॉय व्हील्स देखील एन-लाइन अंतर्गत येणार आहेत.

2) Mahindra XUV400

महिंद्रा आपली नवीन इलेक्ट्रिक कार लॉंच करणार आहे, या अपकमिंग कारचे नाव Mahindra XUV 400 इलेक्ट्रिक SUV कार असेल. 8 सप्टेंबर रोजी भारतात एंट्री होणार आहे. XUV 400 च्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नवीन फ्रंट फेस, लांब व्हीलबेस इत्यादी दिसू शकतात. ही कार एका चार्जमध्ये 350 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

हे सुद्धा वाचा

3) Tata Nexon, Harrier आणि Safari

टाटा मोटर्स आपली Nexon, Harrier आणि Safari अपडेट व्हर्जनमध्ये आणू शकते. या तीन कारच्या नवीन व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. पण यात काही कॉस्मेटिक बदल केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, पॉवरट्रेन पर्यायामध्ये कोणताही बदल होणार नाही. कंपनी या कार नवीन पेंट स्टाइलमध्ये बाजारात आणण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.