Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bajaj Pulsar : पल्सरचे ‘हे’ अपकमिंग मॉडेल झाले स्पॉट… कधी होणार भारतात लाँच?

बजाज पल्सरची लोकप्रियता सर्वांनाच माहिती आहे. असं कुणीही नाही ज्याने बजाजच्या पल्सरचे नाव एकले नसेल. अगदी कॉलेज कुमारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच पल्सरचे चाहते आहे. त्यामुळे कंपनीने वारंवार पल्सरच्या मॉडेलमध्ये बदल करुन गाहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे.

Bajaj Pulsar : पल्सरचे ‘हे’ अपकमिंग मॉडेल झाले स्पॉट... कधी होणार भारतात लाँच?
पल्सरचे ‘हे’ अपकमिंग मॉडेल झाले स्पॉटImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 11:39 AM

दमदार इंजीन, आकर्षक व स्पोर्टी लूक, (Sporty look) चांगला मायलेज आदी विविध कारणांमुळे बजाजची पल्सर (Bajaj Pulsar) खासकरुन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. बजाज पल्सरच्या सुरुवातीच्या मॉडेलपासून ते आतापर्यंत कंपनीने अनेकवेळा मॉडेल अपग्रेड केले, प्रत्येक वेळी याला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, नुकतेच पल्सरच्या एक नवीन मॉडेलला स्पॉट करण्यात आले आहे. बजाज आपली न्यू जनरेशनची (New Generation) मोटरसायकल बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. ही एक टायर, फ्रंट डिस्कसह उपलब्ध होईल अशी आशा आहे. सोबतच अनेक विविध फिचर्स यात असण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच दिसून आलेल्या मॉडेलनुसार ही एक ट्युबलर फ्रेमवर तयार करण्यात आलेली आहे. लवकरच ती भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

‘गाडीवाडी’ नावाच्या एका वेबसाइटनुसार, नेक्स्ट जनरेशन पल्सर 125 चा लूक पाहून त्यात काय काय फिचर्स असतील याची कल्पना होउ शकते. ही एक एंट्री लेव्हल पल्सर असेल, ज्यात 150 सीसीच्या बाइकसारखे आउट लाइन असू शकते. या मॉडेलला एअर कुल्ड सेटअप आणि ऑइल कुलर्स आदी देण्यात येउ शकतात.

125 आणि 150 सीसी इंजीन

बजाज पल्सरमध्ये 125 सीसी इंजीन आणि 150 सीसी इंजीनचा आकार जवळपास सारखाच असतो. 2013 बजाज पल्सर 125 डिझाइन एन250 आणि एफ 250मध्ये उपलब्ध असेल. अपकमिंग पल्सरचा लूक आणि बॉडी वर्क इन बाइकच्या बरोबर असेल. हेडलँप युनिट्‍सची रचना एफ 250 पासून घेण्यात आलेली असू शकते.

हे सुद्धा वाचा

हे आहेत संभावित फिचर्स

लहान सी विंड स्क्रीनच्या आत हॅलोजन टर्न सिंग इंटीग्रेटेड केले जाउ शकतात. यात टेलीस्कोपिक फ्रंट फार्क, अलॉय व्हील्स, अपराइट हँडलबार, पोजिशन, रिलेक्स्ड फूटपेज्स, बेली पॅन आणि समोर डिस्क बेकचा वापर करण्यात येउ शकतो.

सध्याच्या पल्सर 125 चे फिचर्स

सध्याच्या पल्सर 125 मध्ये 124.4 सीसीचे सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजीन देण्यात आले आहे. हे इंजीन 11.64 बीएचपीची पॉवर देते. ज्यासाठी 8500 आरपीएमची गरज असेल. सोबतच हे 6500 आरपीएमवर 10.8 एनएमचा पीकटॉर्क जनरेट करु शकते. अपकमिंग पल्सरचीही एक्सशोरुम किंमत जुन्या मॉडेलच्या जवळपास 85 ते 91 हजार रुपये असू शकते.

निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
'माझी इच्छा नसतानाही पुरूष...', पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप.
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.