30 हजार कमविणारे देखील खरेदी करु शकणार Hyundai Exter CNG, कसा पडणार EMI पाहा
Hyundai Exter CNG on EMI : जर तुम्हाला चांगल्या आणि कमी बटेजमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या एसयुव्हीची गरज असेल तर हुंडईची कार तुमच्यासाठी परफेक्ट चॉईस ठरू शकते. या कारच्या फायनान्स प्लानविषयी जाणून घेऊयात.....

Hyundai Exter CNG Finance Plan : हुंडई कंपनीने आपल्या प्रसिद्ध एसयुव्ही एक्सटरचा नवीन CNG व्हर्जन लाँच केले आहे. या मालिकेचे हे सगळ्यात स्वस्त आणि मस्त मॉडेल आहे. याची शोरुम किंमत 7.50 लाख आहे. विशेष म्हणजे या Exter SUV सीएनजी सोबत चांगल्या मायलेज आणि सेफ्टी फिचर्स दोन्ही देत आहे. त्यामुळे ही कार मध्यम वर्गीयासाठी फॅमिली कार ठरु शकते. या कारची ऑन रोड किंमत. EMI प्लान, डाऊन पेमेंट ऑप्शन सर्वकाही विस्ताराने पाहूयात….
Hyundai Exter CNG ला EMI काय ?
जर तुमचा पगार ३० हजार ते ४० हजार रुपयांदरम्यान आहे. तर तुम्हाला सहजपणे Hyundai Exter CNG SUV ला ईएमआयवर खरेदी करता येईल. दिल्लीत या कारची ऑन रोड किंमत सुमारे ८.४४ लाख रुपये आहे. मुंबईतही त्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे. दोन लाख रुपये डाऊन पेमेंट भरायची तयारी असेल तर बँककडून तुम्हाला ६.४४ लाखाचे कार लोन घ्यावे लागेल.
जर तुम्हाला हे कर्ज ९.५ टक्के व्याजाने आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी मिळतेय तर तुम्हाला महिन्याला ईएमआय जवळपास १३,५०० रुपयांचा येईल. या प्रकारे तुम्ही पाच वर्षांत बँकेला एकूण ८.११ लाख भरु शकाल. ईएमआय आणि व्याज दर तुमचा क्रेडिट स्कोअर आणि ज्या बँकेतून तुम्ही लोन घेणार त्यावर आधारीत असू शकतो. याशिवाय वेगवेगळ्या शहरात या कारची ऑन रोड किंमत कमी जास्त असू शकते.




Hyundai Exter CNG चे फिचर्स काय ?
Hyundai Exter CNG UR केवळ स्वस्तच नाही तर चांगली SUV असून यात शानदार फिचर्सचा समावेश आहे.या फिचर तर महागड्या कारमध्ये ही मिळत नाहीत. सेफ्टी फिचरचा विचार करता या कारच्या सर्व व्हेरीएंटमध्ये ६ एअर बॅग्स मिळतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही कार बेस्ट आहे. यात प्रत्येक प्रवाशांला 3 पॉईंट सीट बेल्ट देण्यात आला आहे. तसेच सिट बेल्ट रिमाईंडर देखील आहे. कारमध्ये सेंट्रल लॉकींग सिस्टीम सारखी अत्याधुनिक मॉर्डन सिक्युरिटी फिचर्स देण्यात आले आहेत.
मायलेज आणि टेक्नोलॉजी
मायलेज आणि टेक्नोलॉजीचा विचार करता Hyundai Exter CNG मध्ये १.२ लिटरचे 4- सिलींडर पेट्रोल इंजिन्स लावण्यात आले आहे. त्यामुळे सीएनजी फ्युअल वर २७.१ किलोमीटर प्रति किलोग्रॅमपर्यंत मायलेज देण्याची क्षमता आहे. या कारमध्ये ड्युअल सिलींडर टेक्नॉलॉजी आहे. ज्यामुळे यात ३९१ लिटरपर्यंत बुट स्पेस उपलब्ध आहे.