CNG Car Tips | सीएनजी कारचे मालक आहात? या टीप्स फॉलो करा अन्‌ मिळवा उत्तम मायलेज

CNG Car Tips News | सीएनजी कार्सला मागणी वाढली आहे. अनेक कार निर्मात्या कंपन्या आपल्या कार्सना सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करीत आहेत. परंतु सीएनजी कार चालवित असताना अनेकांना त्यातून चांगला मायलेज मिळत नाही. पेट्रोल अन्‌ डिझेल गाड्यांच्या तुलनेमध्ये सीएनजी गाड्यांना मायलेज जास्त चांगला असतो.

CNG Car Tips | सीएनजी कारचे मालक आहात? या टीप्स फॉलो करा अन्‌ मिळवा उत्तम मायलेज
सीएनजी कार टिप्सImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 5:15 PM

CNG Car Tips News | पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी अनेक जण सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करीत आहेत. त्यात, विशेषत: सीएनजी कारला (CNG Cars) मागणी वाढली आहे. अनेक कार निर्मात्या कंपन्या आपल्या कार्सना सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करीत आहेत. परंतु सीएनजी कार चालवित असताना अनेकांना त्यातून चांगला मायलेज मिळत नाही. पेट्रोल अन्‌ डिझेल गाड्यांच्या तुलनेमध्ये सीएनजी गाड्यांना मायलेज (Mileage) जास्त चांगला असतो. त्यामुळे अनेक जण सीएनजी वाहनांनाच प्राधान्य देत असतात. या लेखात आम्ही काही टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन ग्राहक सीएनजी कारमधून चांगला मायलेज मिळवू शकणार आहेत. या चार टिप्स त्यांनी अंमलात आणल्या तर त्यांची कार तर उत्तम स्थितीत राहिलच पण ती बुंगाट धावेल पण. या टिप्स कोणत्या आहेत ते पाहुयात.

एअर फिल्टर स्वच्छ ठेवा

सीएनजी कारमध्ये चांगला मायलेज मिळविण्यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे एअर फिल्टरची चांगली काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्येक 5 हजार किमीच्या रेंजनंतर युजर्सनी एअर फिल्टर बदलने आवश्‍यक आहे. एअर फिल्टर बदलण्यामुळे हवेच्या तुलनेत सीएनजी हलकी होते. चांगल्या मायलेजसाठी हवा आणि सीएनजीचा रेशो समान असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे एअर फिल्टरला साफ ठेवले पाहिजे. त्याला वेळोवेळी बदलले पाहिजे.

स्पार्क प्लगला बदला

सीएनजी कारचे इग्निशन टेंपरेचर पेट्रोल कारपेक्षा जास्त असते. त्यामुळे सीएनजी कारमध्ये दमदार स्पार्क प्लगचा वापर करणे आवश्‍यक असते. कारमध्ये एकाच कोडच्या स्पार्क प्लगचा बरोबर सेट लागलाय की नाही, हे बघणे आवश्‍यक असते. कारची हीट रेंजदेखील कंपनीनुसार असणे आवश्‍यक असते. चांगल्या स्पार्कपासून सीएनजी आणि हवेचे मिक्स्चरचे चांगले इग्निशन होत असते. यामुळे कारचा मायलेज चांगला होत असतो.

हे सुद्धा वाचा

टायरचे प्रेशर तपासा

टायरचे प्रेशर नेहमी तपासले पाहिजे. टायरचे योग्य प्रेशर केवळ मायलेजच वाढवत नाही तर, युजर्सच्या सुरक्षेसाठीही ते आवश्‍यक असते. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये खासकरुन टायरचे प्रेशर तपासले पाहिजे. टायरमध्ये हवा कमी असल्यास कारवर जास्त दबाव निर्माण होत असतो. त्यामुळे जास्त सीएनजी लागतो.

कारच्या क्लचची तपासणी करावी

कारचा क्लच एक घर्षण होणारी डिस्क आहे. ही कारच्या ट्रांसमिशनमध्ये असते. घसून गुळगुळीत झालेला क्लच कारच्या मायलेजला कमी करु शकतो. कारण हे इंजिन पॉवरला पायाजवळ जाण्यापासून रोखत असते. त्यामुळे सीएनजी कारचा मायलेज खराब होउ शकतो. त्यामुळे सीएनजीदेखील जास्त लागू शकतो.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.