Marathi News Automobile TOP 10 Best selling cars in Indian, June 2021 sale report, Maruti suzuki Dominating market
Photos | भारतीय कार मार्केटवर मारुती आणि ह्युंदायचं वर्चस्व, टॉप 10 मध्ये Maruti च्या 8 गाड्या
कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे.
1 / 11
सर्व कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी कंपनीने जूनमध्ये एकूण 147,388 मोटारींची विक्री केली आहे, तर मेमध्ये ही संख्या 57,228 इतकी होती. जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीच्या 8 गाड्यांचा टॉप 10 वाहनांच्या यादीमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त, ह्युंदायच्या क्रेटा एसयूव्ही आणि Grand i10 Nios प्रीमियम हॅचबॅक या दोन गाड्यांनी टॉप सेलिंग वाहनांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ह्युंदाय ही मारुतीनंतरची देशातील दुसरी सर्वात यशस्वी वाहन कंपनी ठरली आहे.
2 / 11
Maruti WagonR : मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R) या कारने जून 2021 मध्ये 19,447 युनिट्सची विक्री साधली आहे. त्यामुळे ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जून 2020 मधील 6,972 युनिटच्या विक्रीच्या तुलनेत गेल्या महिन्यात वॅगन आरच्या विक्रीत मारुती सुझुकीने 179 टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे वॅगन आरने देशातील स्विफ्ट हॅचबॅक कारला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
3 / 11
Maruti Swift : गेल्या महिन्यात मारुतीने स्विफ्टच्या 17,272 वाहनांची विक्री केली आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत स्विफ्टने दुसरं स्थान पटकावलं आहे.
4 / 11
Maruti Baleno : विक्रीच्या बाबतीत ही कार मे महिन्यात देशात सातव्या स्थानी होती. मात्र जूनमध्ये या कारने तिसरं स्थान पटकावलं आहे. कंपनीने जून 2021 मध्ये या कारच्या 14,701 युनिट्सची विक्री केली आहे.
5 / 11
Maruti Vitara Brezza : जून महिन्यात मारुतीच्या या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या 12,833 युनिट्सची विक्री झाली आहे.
6 / 11
Maruti Dzire : टॉप 10 यादीमध्ये समाविष्ट असलेली ही पहिली सब कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. जूनमध्ये मारुतीने या कारच्या 12,639 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 5,834 मोटारींची विक्री केली होती.
7 / 11
Maruti Alto : भारतातील सर्वात जुन्या हॅचबॅक कारने टॉप 10 यादीत स्थान मिळवले हे आश्चर्यच आहे. तथापि, जूनमध्ये ही कार बर्याच लोकांना आवडली आणि या कारची एकूण विक्री 12,513 युनिट्स इतकी होती. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने या कारची एकूण 7,298 वाहने विकली होती.
8 / 11
Hyundai Creta : ह्युंदायची ही कार बेस्ट सेलर एसयूव्ही ठरली आहे. जूनमध्ये ह्युंदायने या कारच्या 9,941 युनिट्सची विक्री केली आहे. तर मागील वर्षी ही आकडेवारी 7,207 इतकी होती.
9 / 11
Maruti Ertiga : ही 7 सीटर एमपीव्ही जूनमध्ये सेगमेंट लीडर होती. गेल्या महिन्यात मारुतीने Ertiga च्या एकूण 9,920 मोटारींची विक्री केली. मागील वर्षी या थ्री-रो सेव्हे सीटर एसयूव्हीची एकूण 3,306 वाहने विकली होती.
10 / 11
Maruti Eeco : मारुतीची ही मिनीव्हॅन अजूनही टॉप 10 यादीमध्ये आहे. गेल्या महिन्यात कंपनीने Eeco च्या एकूण 9,218 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या वर्षी याच काळात कंपनीने एकूण 3,803 वाहनांची विक्री केली होती.
11 / 11
Hyundai Grand i10 Nios : टॉप 10 वाहनांच्या यादीत समाविष्ट होणारी Hyundai Grand i10 Nios ही शेवटची तर ह्युंदायची दुसरी कार आहे. जूनमध्ये कंपनीने या कारच्या 8,787 युनिट्सची विक्री केली आहे.