Auto: जानेवारी महिन्यात ‘या’ गाड्यांची सर्वाधिक विक्री, टॉप 10 मध्ये मारुतिच्या 7 कार

Top 10 Car January 2023: जानेवारी 2023 या महिन्यात मारुति सुझुकी कंपनीच्या गाड्यांचा बोलबाला पाहायला मिळाला. टॉप 10 यादीत मारुतिच्या सात गाड्या आहेत. तर टाटाच्या दोन आणि ह्युंदाईच्या एका गाडीचा समावेश आहे.

Auto: जानेवारी महिन्यात 'या' गाड्यांची सर्वाधिक विक्री, टॉप 10 मध्ये मारुतिच्या 7 कार
जानेवारी महिन्यात ऑटो क्षेत्रात मारुतिचा बोलबाला, सात गाड्यांना ग्राहकांची पसंतीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 5:46 PM

मुंबई: ऑटो क्षेत्रात गेल्या काही दिवसात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. पेट्रोल डिझेलनंतर इलेक्ट्रिक गाड्यांची भर पडली आहे. त्यात नव्या तंत्रज्ञानासह हायड्रोजन कारची भर पडली आहे. असं असलं तरी भारतीय मार्केटवर मारुति सुझुकीचं राज्य असल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये ग्राहकांनी सर्वाधिक पसंती मारुति सुझुकीच्या गाड्यांना दिली. टॉप 10 विक्रीमध्ये मारुति सुझुकीच्या सात गाड्या आहेत. या यादीत मारुति सुझुकी अल्टो ही आघाडीवर आहे. डिसेंबर 2022 ला मारुतिची वेगन आर आघाडीवर होती. मात्र गेल्या महिन्यात अल्टोनं पुन्हा एकदा पहिलं स्थान काबिज केलं आहे. टाटाच्या नेक्सान आणि पंचला ग्राहकांनी पसंती दिली आहे. तर या यादीत कोरियन कंपनी असलेल्या ह्युंदाईच्या क्रेटाचा समावेश आहे.

मारुति अल्टो (Maruti Alto): मारुति सुझुकीची अल्टो ही कार ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. गेल्या महिन्यात या गाडीची सर्वाधिक विक्री झाली आहे. एकूण 21411 युनिट्स विक्री जानेवारी 2023 महिन्यात झाली आहे. गेल्या वर्षातील जानेवारी 2022 च्या तुलनेत ही विक्री 70 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 12342 गाड्यांची विक्री झाली होती. मारुतिने गेल्यावर्षी नव्या फीचर्ससह नव्या दमाची अल्टो हॅचबॅक लाँच केली होती. या गाडीची सुरुवातीची किंमत 3.99 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे.

मारुति वेगनआर (Maruti WagonR): टॉप 10 गाड्यांच्या यादीत मारुति वेगनआर दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये वेगनआर आघाडीवर होती. मात्र आता अल्टोला पसंती मिळाल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागत आहे. वेगनआरच्या 20466 युनिट्सची विक्री झाली आहे.

मारुति स्विफ्ट (Maruti Swift): मारुतिची टॉप 10 मधील ही तिसरी गाडी आहे. छोट्या गाड्यांच्या यादीतील ही सर्वाधिक पसंतीची गाडी ठरली आहे. जानेवारी 2023 या महिन्यात कंपनीने 16440 युनिट्सची विक्री केली. पण गेल्या वर्षातील जानेवारी 2022 च्या तुलनेत ही विक्री घटली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 19108 युनिट्सची विक्री झाली होती. पण डिसेंबर 2022 च्या तुलनेत ही विक्री नक्कीच वाढली आहे.

मारुति बलेनो (Maruti Baleno): बलोनो ही टॉप 10 यादीतील चौथी गाडी आहे. न्यू जनरेशन बलोनो गेल्या वर्षीच लाँच केली होती. त्यानंतर या गाडीच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात 16357 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये फक्त 6791 युनिट्सची विक्री झाली होती.

टाटा नेक्सन (Tata Nexon)- टॉप 10 यादीतील नेक्सन ही पाचवी गाडी आहे. एसयूव्ही सेगमेंटमधील या गाडीला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. कंपनीने आयसीई आणि ईव्ही अवतारात गाडी लाँच केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 15,567 युनिट्सची विक्री केली आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत ही विक्री 3541 युनिट्सने वाढली आहे.

ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta): कोरियन कंपनीची ह्युंदाई क्रेटा या यादीत सहाव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात सर्वाधिक मागणी असलेली एसयूव्ही ठरली होती. जानेवारी महिन्यात 15037 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 9869 युनिट्सची विक्री झाली होती.

मारुति ब्रेझा (Maruti Brezza): टॉप 10 गाड्यांच्या यादीत ही मारुतिची पाचवी गाडी आहे. विक्रीत सातव्या क्रमांकाची पसंती असलेली गाडी आहे. जानेवारी 2023 या महिन्यात 14359 युनिट्सची विक्री झाली.

टाटा पंच (Tata Punch): पंच ही टाटा कंपनीची दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 12006 युनिट्सची विक्री केली आहे. जानेवारी 2022 मध्ये 10027 आणि डिसेंबर 2022 मध्ये 10586 युनिट्सची विक्री झाली होती.

मारुति इको (Maruti Eeco): मारुतिची इको ही गाडी या यादीत आठव्या स्थानावर असून कंपनीची सहावी गाडी आहे. या गाडीचं मार्केटमधील स्थिती गेल्या काही वर्षांपासून जैसे थेच आहे असंच म्हणावं लागेल. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 11709 युनिट्सची विक्री केली आहे.

मारुति डिझायर (Maruti Dzire):टॉप 10 कारच्या यादीत डिझायर ही गाडी दहाव्या स्थानावर आहे. सेडान सेगमेंटमधील डिझायर ही टॉप 10 मधील एकमेव कार आहे. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये 11317 युनिट्सची विक्री केली आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.