देशात इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला, पण सर्वाधिक पसंतीच्या टॉप 5 Electric Scooter कोणत्या?
भारतात हळूहळू लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचे आकडेदेखील सकारात्मक आहेत.
मुंबई : भारतात हळूहळू लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचे आकडेदेखील सकारात्मक आहेत. फेब्रुवारीमधील एकूण इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) विक्रीमध्ये जवळपास 60 टक्के बाजार हिस्सेदारीसह इलेक्ट्रिक टू व्हीलरने (Electric Two Wheeler) भारतात ईव्ही विक्री सुरू ठेवली आहे. ईव्ही दुचाकी सेगमेंटमध्ये मागील महिन्यात ईव्हीच्या एकूण 54,557 युनिट्सपैकी 32,416 हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या गेल्या. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जानेवारीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि नोंदणीत 444 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) या यादीत भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी राहिली आहे. फेब्रुवारीमध्ये ओला इलेक्ट्रिकनेही नोंदणीत मोठी उडी घेतली. चला तर मग जाणून घेऊया भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांची यादी आहे.
हिरो इलेक्ट्रिकने फेब्रुवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या 7,356 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत हिरो इलेक्ट्रिकच्या विक्रीत तिप्पट वाढ झाली आहे. हिरो इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ 2,194 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या होत्या. तथापि, हिरो इलेक्ट्रिकच्या विक्रीत या वर्षी जानेवारीच्या तुलनेत किंचित घट झाली, कारण या ब्रँडने जानेवारी 2022 मध्ये 7,763 युनिट्सची विक्री केली होती.
- हिरो इलेक्ट्रिक : Hero Electric ने 2021 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या 46,260 युनिट्सची विक्री केली आहे. या EV ब्रँडचा भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाटा आहे. दरम्यान, कंपनीने पहिल्या दोन महिन्यांत 15,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. या दराने हिरो इलेक्ट्रिक कंपनी या वर्षी तिची विक्री जवळपास दुप्पट करू शकते. भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक दुचाकी निर्मात्या कंपनीने फेब्रुवारीमध्ये विक्रमी विक्री केली आणि गेल्या महिन्यात 5,923 युनिट्सची नोंदणी केली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 1,067 युनिट्सची केली होती. यावर्षीची विक्री गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे.
- ओकिनावा : ओकिनावा या इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षी 29,945 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या होत्या. या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान, कंपनीने 11,536 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या आहेत. ओकिनावा देखील यावर्षी आपली विक्री दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे, विशेषत: नवीन मॉडेल लॉन्च करून कंपनीने बाजारावर चांगलीच पकड बनवली आहे.
- अॅम्पियर : अँपिअर व्हेइकल्स ही फेब्रुवारीमधील सर्वात जास्त इलेक्ट्रिक दुचाकी विकणारी कंपनी ठरली आहे. एका महिन्यात कंपनीच्या रिओ, रिओ एलिट, मॅग्नस EX, मॅग्नस प्रो आणि झील या EV मॉडेल्सच्या 4,303 युनिट्सची विक्री झाली आहे. जी गेल्या वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 806 युनिट्सपेक्षा जास्त आहे.
- ओला इलेक्ट्रिक : ओला इलेक्ट्रिक ही कंपनी भारतातील टॉप पाच इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक आहे. ओला इलेक्ट्रिकला त्यांच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यापासून खूप मागणी आहे. फेब्रुवारीमध्ये ओला इलेक्ट्रिकने नोंदणीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात कंपनी 3,904 युनिट्स वितरित केल्या आहेत.
- अॅथर एनर्जी : Ather Energy ही बंगळुरू-आधारित EV स्टार्टअप कंपनी आहे. Ather Energy च्या विक्रीत गेल्या महिन्यात थोडी घट झाली. तरिही कंपनी टॉप 5 मध्ये कायम आहे. जानेवारीतल्या 2,825 युनिट्सच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये कंपनीने 2,229 युनिट्सची विक्री केली. तथापि, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमधील 626 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत ही चांगली वाढ आहे.
इतर बातम्या
बाईक म्हटलं की पेट्रोलची कटकट, आता इलेक्ट्रिक स्कूटरचीही वटवट, लवकरच ‘भाव खाणार’
Electric Bus | पुण्यातील बाणेर आगारातील इलेक्ट्रीक बस ओलेक्ट्रा कंपनीच्या! या बसची खासियत जाणून घ्या